रामदेव बाबांची कमाल, सर्दी खोकल्याचे औषध सांगून बनवले कोरोनाचे औषध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोमवारी बाबा रामदेव यांनी कोरोना औषध बनवल्याचा दावा करत कोरोनील औषध लॉन्च केल होते. त्यावरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे. आयुष मंत्रालयाने पंतजलीला या औषधाची जाहिरात करण्यास रोखले आहे. आता बाबा रामदेव यांना दुसरा धक्का बसला आहे. बाबा रामदेव यांनी सर्दी खोकल्याचे औषध बनवतो असे सांगून लायसन्स घेतले आणि कोरोनाचे औषध बनवले असे उत्तराखंडच्या अधिकार्‍यांनी म्हटले आहे.

उत्तराखंडच्या आयुर्वेदिक आणि ड्रग्स लायन्स ऑथॉरिटीचे उपनिर्देशक यतेंद्र सिंह रावत म्हणाले की बाबा रामदेव यांच्या कंपनीला कोरोना औषधासाठी लायसन्स दिलेच नव्हते. त्यांना सर्दी खोकला आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीच्या औषधासाठी लायन्सन जारी करण्यात आले होते. बाबा रामदेव यांनी कोरोनाचे औषध बनवले हे आपल्याला प्रसारित बातम्यांमधून कळाल्याचे रावत यांनी सांगितले.

पंतजलीला नोटिस

हिंदुस्थान सरकारने म्हटले आहे की कोणीही कोरोनावर औषध बनवून त्याचा प्रचार प्रसार नाही करू शकत. आयुष मंत्रालयाच्या परवानगीनंतरच औषध बनवता येईल. सध्या उत्तराखंडच्या आयुर्वेदिक आणि ड्रग्स लायन्स ऑथॉरिटीने पंतजलीला नोटीस बजावली आहे. तसेच मंगळवारी आयुष मंत्रालयानेही पंतजलीला या औषधाच्या प्रचार प्रसारावर बंदी घातली आहे.