बीडमध्ये कोरोनाच्या मीटरला ब्रेक, दुसऱ्या दिवशीही सर्व अहवाल निगेटिव्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीड जिल्ह्यातून आज 65 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यात 63 जणांचे अहवाल निगेटीव्ह आढळून आहेत तर 2 जणांचे अहवाल रिजेक्ट आहेत. सलग दुसऱ्या दिवशी तपासलेल्या रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा पॅटर्न बीड जिल्ह्यात यशस्वी होताना दिसत आहे.

काल बीड जिल्ह्यातून पाठवण्यात आलेल्या 17 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर मोठा दिलासा मिळाला होता. आज बुधवारी बीड जिल्ह्यातून 65 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. बीड येथील कोविड केअर सेंटर मधून 34 जणांचे अहवाल तर अंबाजोगाई 10 केज मधून 9 माजलगाव येथुन 8 जिल्हा रुग्णालय सामान्य विभागातून 2, परळी येथून 2 अहवाल पाठवण्यात आले होते. आज पाठविलेल्या   65 पैकी 63 अहवाल निगेटिव्ह तर 2 रिजेक्टेड आहेत. एका लग्नाच्या कार्यक्रमानंतर फोफावलेला कोरोना कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमुळे आटोक्यात येताना दिसत आहे.