मुंबईत कोरोनाचे 1300 नवे; रुग्ण, 23 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत एकाच दिवसांत कोरोनाचे 1300 नवे रुग्ण नोंद झाले असून २३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासांत 823 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणार्‍यांची संख्या 43 हजार 154 वर पोहोचली आहे.

मुंबईतील एकूण मृतांच्या आकडेवारीत प्रलंबित 64 अहवालांचाही समावेश केल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण मृतांची संख्या आता 1369 झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण 87 मृतांमध्ये 55 पुरुष आणि 32 महिलांचा समावेश आहे. यातील 49 जणांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त होते. तर 32 रुग्ण 40 ते 60 वर्षे वयोगटातील तर 6 जणांचे वय 40 वर्षांपेक्षा कमी होते. मृतांमधील 54 जणांना दीर्घकालीन आजार होते असेही पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, मुंबईत सध्या 27 हजार 524 सक्रिय रुग्ण असल्याचे पालिकेने जाहीर केले आहे.