
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला अजून एक दणका दिला आहे. चायनीज सोशल मीडिया Weibo वरून आपले खाते डीलीट केले आहे. यापूर्वी केंद्र सरकारने चीनचे टिकटॉकसह 59 ऍपवर बंदी घातली होती.
For VIP accounts, Weibo has a more complex procedure to quit which is why the official process was initiated. For reasons best known to the Chinese, there was great delay in granting this basic permission: Sources https://t.co/aEtTLxIPFm
— ANI (@ANI) July 1, 2020
Weibo हे लोकप्रिय ऍप आहे. मिळालेल्या माहितीनुसार या ऍपमधून व्हीआयपी अकाऊंट डीऍक्टिवेट करणे कठीण प्रक्रिया आहे. अधिकृतरित्या मोदींची प्रोफाईल काढण्याचे काम सुरू आहे. Weibo ऍपवर पंतप्रधान मोदींच्या 115 पोस्ट आहेत. या पोस्टही आता डीलीट करण्यात येणार आहेत. आतापर्यंत 113 पोस्ट डीलीट करण्यात आल्या आहेत.
नुकतंच लडाखमध्ये गलवान खोर्यात हिंदुस्थान आणि चीनच्या सैनिकांमध्ये झटापट झाली होती. त्यात हिंदुस्थानचे 20 जवान शहीद झाले होते. तसेच यात चीनचेही काही सैनिक मारले गेले होते. त्यानंतर दोन्ही देशांनी आपले सैनिक मागे घेऊन शांततेची वार्ता सुरू ठेवली. त्यानंतर हिंदुस्थान सरकारने सुरक्षेच्या कारण्यास्तव टिकटॉक, हेलो, शेअर इट सारखे ५९ लोकप्रिय ऍप्सवर बंदी घातली आहे.
























































