
कुख्यात गुंडाला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गुंडाने आणि त्याच्या साथीदारांनी प्राणघातक हल्ला केला. यामुळे उडालेल्या चकमकीत उत्तर प्रदेश पोलिसांच्या 8 कर्मचारी शहीद झाले आहे. यामध्ये एका पोलीस उप अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याचाही समावेश आहे. विकास दुबे असं या गुंडाचे नाव आहे. त्याला पकडण्यासाठी पोलीस उप अधीक्षक देवेंद्र मिश्रा यांच्या नेतृत्वात पथक गेलं होतं.
8 UP cops, including deputy SP, killed in encounter in Kanpur while trying to arrest history sheeter facing 60 criminal cases: Police
— Press Trust of India (@PTI_News) July 3, 2020
बिकारू गावामध्ये 60 हून अधिक गुन्ह्यांची नोद असलेला विकास दुबे लपून बसला असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. त्याला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले होते. दुबे याला अटक करण्यासाठी हे पथक गावात पोहोचले तेव्हा त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.
Kanpur: 8 Police personnel lost their lives after being fired upon by criminals when they had gone to raid Bikaru village in search of history-sheeter Vikas Dubey. SSP Kanpur says, “They’d gone to arrest him following complaint of attempt to murder against him.They were ambushed” pic.twitter.com/9Qc0T5cKPw
— ANI UP (@ANINewsUP) July 3, 2020
पहाटे एकच्या सुमारास ही चकमक उडाल्याचे वृत्त असून जिथे ही चकमक उडाली होती त्या ठिकाणापासून काही अंतरावर दुसरी चकमक उडाली होती. या चकमकीमध्ये 3 गुंडांना ठार मारण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. हे तिघेहीजण विकास दुबेचे साथीदार असल्याचं स्पष्ट झालं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या चमकीमध्ये शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांप्रती सहानूभूती व्यक्त केली आहे.
CM Yogi Adityanath has expressed his condolence to the families of the 8 Police personnel who lost their lives after being fired upon by criminals in Kanpur. He has directed DGP HC Awasthi to take strict action against criminals, he also sought report of the incident. (file pic) pic.twitter.com/YLK3vpsy5n
— ANI UP (@ANINewsUP) July 3, 2020
ज्या आरोपीला पकडण्यासाठी हे पथक गेले होते तो आरोपी विकास दुबे हा मात्र फरार झाला आहे. त्याला शोधण्यासाठी इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्स प्रणालीचा आधार घेतला जात आहे. दुबे याने रस्त्यात जेसीबी आडवा घालून ठेवला होता, ज्यामुळे पोलिसांचा रस्ता बंद झाला होता. तिथेच विकास आणि त्याच्या साथीदारांनांनी दबा धरला होता. पोलिसांच्या गाड्या अडताच विकास आणि साथीदारांनी त्यांच्यावर हल्ला केला.
STF has been deployed. IG/STF is reaching the spot. Kanpur STF is already at work. A large scale opeartion is being carried out. This is in continuation with the operation for which the team had gone there in the first place: DGP HC Awasthi pic.twitter.com/lLhd5MNFXV
— ANI UP (@ANINewsUP) July 3, 2020
उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक एच.सी अवस्थी यांनी विशेष कृती दल हे घटनास्थळी पोहोचत असल्याचे सांगितले. घटनास्थळी महानिरीक्षक, अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक( कायदा सुव्यवस्था) हे देखील पोहोचले असल्याचे त्यांनी सांगितलेविकास दुबे याला शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोध मोहिमेला सुरूवात झाल्याचेही त्यांनी सांगितले. विकास दुबे आणि त्याच्या साथीदारांनी उचावरून गोळ्या झाडल्याने पोलीस कर्मचारी शहीद झाल्याचे अवस्थी यांनी सांगितले. अंधाराचा फायदा घेत आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले, त्यातील तिघांचा चकमकीत खात्मा झाल्याचे कळते आहे. विकास दुबे मात्र अध्याप फरार आहे.



























































