
येत्या रविवारी 5 जुलै रोजी आषाढ पौर्णिमेच्या दिवशी छायाकल्प म्हणजेच मांद्य चंद्रग्रहण आहे. हे चंद्रग्रहण हिंदुस्थानातून दिसणार नाही.
याविषयी अधिक माहिती सांगताना, पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. पृ. सोमण म्हणाले, रविवारी सकाळी 8.34 ते 9. 25 यावेळेत चंद्र पृथ्वीच्या दाट छायेभोवती असणाऱया विरळ छायेतून जाणार आहे. परंतु त्यावेळी चंद्र आपल्या दृश्य आकाशात नसल्याने हे छायाकल्प चंद्रग्रहण हिंदुस्थानातून दिसणार नाही. अमेरिका, न्यूझीलँड येथून दिसणार आहे. यानंतर 30 नोव्हेंबर 2020 रोजी होणारे छायाकल्प चंद्रग्रहणही हिंदुस्थानातून दिसणार नसल्याचे त्यांनी सांगितले. 5 जुलै रोजी गुरुपौर्णिमा असून ती साजरी करण्यामध्ये या छायाकल्प चंद्रग्रहणाचा कोणताही अडथळा नाही.
























































