ई-पाससाठी सहायक पोलीस फौजदाराकडून घेतले दीड हजार रुपये; एकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime

लॉकडाउनमुळे प्रवासासाठी पोलिसांकडून ई-पास बंधनकारक करण्यात आला आहे. त्याचा गैरफायदा घेत ई-पास काढून देण्याची फेसबुकवर जाहिरात करुन सहायक पोलिस फौजदाराकडून दीड हजार रुपये उकळल्याप्रकरणी तरुणाला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. महेश वाघमारे (वय 27, रा. भोसलेनगर, हडपसर ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सहायक पोलीस फौजदार शरद देडगे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाउनच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांकडून अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना प्रवासाठी ई-पास उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्याचा गैरफायदा घेउन महेशने फेसबुकवर कॅब सर्व्हिस उपलब्ध आहे. आमच्याकडून प्रवासासाठी ई-पास पुरविला जातो, अशी पोस्ट केली. त्यानुसार शरद यांनी महेशला दीड हजार रुपये दिले. त्यानंतर महेशने शरदची कोणतीही वैद्यकीय चाचणी न करता लोणी-काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून अधिकाऱ्याच्या सहीचे वैद्यकीय प्रमाणपत्र देत शासनाची फसवणूक केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी जाधव अधिक तपास करीत आहेत.