लेख – संत नामदेवांचा राम-हरिपाठ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नामदेव वसंत सदावर्ते

श्रीसंत नामदेवरायांच्या हरिपाठात भगवंतांची संध्येतील चोवीस नामे आहेत. चोवीस नावांसह नाममाहात्म्य वर्णन केले आहे. नामदेवराय स्वतः नामस्वरूपी एकरूप झाले होते. नाम होणे म्हणजेच देव होणे. नाम घ्यावयाचे नसते किंवा द्यावयाचे नसते, तर नाम व्हावयाचे असते. स्वतः भक्ताने, नामस्मरण, जप करणाऱयाने नामरूप होणे ही नामयोगाची सफलता होय. नामस्मरण म्हणजे महाचैतन्याची अखंड स्फुरणधारा होय. संतांच्या हरिपाठात आध्यात्मिक मार्गदर्शन, तत्त्वज्ञान व आत्मज्ञान सांगितले आहे.

संतशिरोमणी नामदेव महाराज हे नाम-विद्येचे प्रणेते होते. त्यांनी वारकरी संप्रदायाचा विस्तार करण्यासाठी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन ज्ञानदेवांबरोबर हिंदुस्थानभ्रमण केले. नामस्मरण भक्तीचा प्रचार करीत त्यांनी आपले उत्तर आयुष्य पंजाबात व्यतीत केले. संत नामदेवांचा हरिपाठही वारकरी संप्रदायात लोकप्रिय आहे. नामदेवांनी विविध विषयांवर अभंगरचना केली आहे. निवृत्ती-ज्ञानदेवादी भावंडांचे चरित्र व त्यांच्या समाधी प्रसंगांचे वृत्तांत त्यांनी अभंगबद्ध केले आहेत. नामस्मरण, प्रेमभक्तीची परिसीमा नामदेवांनीच गाठली. नामदेवांची अभंगवाणी नितांत प्रेमळ आहे.

निरक्षरांनासुद्धा नामस्मरण भक्ती करण्याचा अधिकार आहे. प्रेमभक्तीसाठी ज्ञानाची आवश्यकता नाही. वेदशास्त्र्ासंपन्न शास्त्र्ााr-पंडिताइतकाच नामस्मरण करणारा अडाणी भाविकसुद्धा भगवंताचा लाडका होऊ शकतो. ज्ञानोबांनीसुद्धा ज्ञानापेक्षा नामजपाची थोरवी हरिपाठात सांगितली आहे. नामदेवही आपल्या हरिपाठात भोळ्या भाविक-भक्तांना नामसामर्थ्य पटवून देत अध्यात्म सांगतात. सर्वांभूती असलेले परब्रह्म अनुभवास येण्यासाठी फक्त भगवंताविषयी एकनिष्ठ प्रेम असणे आवश्यक आहे. नामजपातूनच प्रेमभक्ती निर्माण होते.

नामदेवांना विसोबा खेचर यांच्याकडून गुरू उपदेश प्राप्त झाल्यावर सर्वांभूती ईश्वर साक्षात्कार झाला. केवळ ईश्वरमूर्तीतच ईश्वर पाहणारे नामदेवराय आत्मानुभवी झाले. तेच अनुभव ज्ञान हे हरिपाठात प्रकट करतात. प्रथम नाम आणि मग ज्ञान असा नामदेवांचा अध्यात्म प्रवास आहे. ज्ञानदेव व नामदेव हे मराठी सारस्वताचे मानबिंदू आहेत. नामदेवाची प्रेमभक्ती पाहून ज्ञानदेवांना नामदेवांच्या सहवासात राहून तीर्थयात्रा करावीशी वाटली. या तीर्थयात्रेचे वर्णनही नामदेवांनी केले आहे.

नामदेवरायांचा हरिपाठही तत्त्वज्ञानाचे व आत्मज्ञानाचे स्पष्ट प्रकटीकरण करणारा आहे. नामदेवांच्या हरिपाठातील सुरुवातीच्या काही अभंगांत नामस्मरणासाठी रामनामाचा आग्रह धरला आहे. ते म्हणतात, नामाची परिसीमा कोणीही सहज गाठू शकत नाही. नामाचे माहात्म्य अगाध आहे. म्हणून केवळ एकनिष्ठsने श्रीरामनामाचा जप करावा. देवावर एकनिष्ठ प्रेम असावे. चित्तभंग न करता, द्वैत भावना न ठेवता श्रद्धा ठेवून भगवंताचे नामस्मरण करावे. त्यासच अनन्य भक्ती म्हणतात. ऐक्य भावाने भगवंतांचे स्मरण करणे हा नामभक्तीचा मूळ पाया आहे. एकनिष्ठsने रामनामाचा जप करावा असे संत नामदेव सांगतात –

नामाचा महिमा कोण करी सीमा । जपावे श्रीरामा ऐक्याभावे ।।1।।
न लगती स्तोत्रें नाना मंत्र तंत्रे । वर्णिजे बा वत्रें श्रीरामनाम ।।2।।
अनंत पुण्यरासी घडे ज्या प्राण्यासी । तरीच मुखासी नाम येत।।3।।
नामा म्हणे राम हा जप परम । तो देह उत्तम मृत्युलोकी ।।4।।

नामोच्चार करण्यासाठी इतर स्तोत्र, मंत्र अथवा यंत्राची गरज नाही. केवळ मुखाने रामनामाचे वर्णन करावे. ज्या प्राण्याच्या पदरी अनंत पुण्याचा ठेवा असेल, तोच मुखाने नाम घेईल. जो रामनामाचा जप करतो, त्याचा देहसुद्धा पवित्र-पावन होतो. स्तोत्र, मंत्र, यज्ञतंत्र यांची आवश्यकता नाही, असे नामदेवराय सांगतात. कारण स्तोत्र मुखपाठ करावे लागते. त्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ जाणून घ्यावा तरच ते स्तोत्र समजते. ते संस्कृतमध्ये असते म्हणून त्याचा उच्चार अचूकपणे तंतोतंत करावा लागतो. त्यासाठी अक्षरओळख, वाचन, लेखन आदी ज्ञानाची गरज लागते, पण मनात केवळ ईश्वरभाव असेल तर भाविकाने केवळ नामजप करावा. त्यासाठी ज्ञानाची गरज नाही.

नारदांसारखे सद्गुरू भेटताच वाल्या कोळ्याला पापाची जाणीव झाली. नारदांनी रामनामाचा जप करण्यास सांगितले. वाल्याला ‘राम’ शब्द उच्चारता येत नव्हता. ‘राम’च्या ऐवजी ‘मरा’ असा उलटा मंत्र पुनः पुन्हा उच्चारू लागला. म्हणून रामनामाच्या जपासाठी ज्ञानाची नव्हे, तर केवळ श्रद्धा, भक्तिभावाची गरज असते.

दोन अक्षरी राम हा जप परम । न लगे तू नेम नाना पंथ ।।

जन्मास आल्यावर जर मनुष्य रामनामाचे पठण करील तर तो एकाच फेरीत वैकुंठास प्राप्त होईल. या इहलोकात जो ‘राम राम’ असे जिव्हेने उच्चारण करील, त्याच्या जिभेवर रामनामाचा ठसा उमटेल, तो आपोआप उद्धरून जाईल. ‘राम’ या दोन अक्षरी रामजपाला इतर धार्मिक नेमनियम आणि विविध पंथ यांची आवश्यकता नाही. श्रीरामाचे चरित्र पवित्र असून ते आपल्या गोत्रातील पूर्वजांचा उद्धार करते.

विषयांचे गोड कां करिसी कोड । होईल तुज जाड इंद्रियबाधा।।

रामनामावाचून जीवाची सुटका होणार नाही. इंद्रियांच्या मोहाने मायाजाळात अडकून नामभजनमार्गाकडे मनाची ओढ धरत नाही. विषयवासनेच्या गोडीची इच्छा करून केवळ तिचे लाडच पुरवशील तर हे जीवा तुला इंद्रियबाधा होईल.

सर्वांभूती भज नमन करी संता । नित्य त्या अच्युता स्मरण करी ।।

सर्व भूतमात्री भगवंताचे रूप पाहून त्यास नमन करा. संतसज्जनांना नमन करा आणि सतत त्या अच्युताचे स्मरण करा. अशा नामस्मरणाने जीवनाची निश्चित वाट सापडेल. वैकुंठात रामकृष्णाची भेट होईल. जीव अज्ञान व शिव ज्ञानी हा भाव ठेवून चराचरी ब्रह्महरी एकच आहे. नामामृताचे सेवन केल्याने यमधर्म जीवास वंदन करील. नामामुळे जीव विष्णूचा जिवलग होईल.

नामा म्हणे होशील जिवलग विष्णूचा । दास त्या हरीचा आवडता।।

हे जीवा, तू मायेचा हव्यास धरतोस आणि मायेची आशा करतो, पण नामभक्तीशिवाय सुखप्राप्ती होणार नाही. नाम हा मंत्र अत्यंत पवित्र आहे. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकी नामच सर्वश्रेष्ठ आहे.

पोसीशी शरीर इंद्रियांचा बांधा । सेखी ते आपदा करील तुज ।।

हे जीवा, तू शरीराचे पोषण करशील, पण विषयवासनेच्या छंदाने तुझे हित न होता हरिनामोच्चारानेच तुझा उद्धार होईल. अनेक व्यर्थ गोष्टींची बडबड करतोस, पण नाम उच्चारीत नाहीस. श्रीविठ्ठलाच्या नामजपाने तू तरून जाशील, असे नामदेवराय म्हणतात. प्रेमपूर्वक नामस्मरणाचा नेम धरावा. विषयवासनेच्या पूर्ततेसाठी तू खटपट करीत आत्मप्रौढी सांगतोस. त्यापेक्षा तू नामस्मरण कर. रात्रंदिवस नामस्मरणाचा ध्यास कर.

हे जीवा, तू विनाकारण इतर कर्मकांड-उपासनादी कार्ये का करतोस? नारायणाचा जप कर. म्हणजे तुझे समाधान होईल. रामकृष्णहरी गोविंद ही नामे नित्यनेमाने नामजप कर. मुनीजन हरिनामानेच उद्धरून गेले. रामनामासारखे दुसरे सोपे साधन नाही.

श्रीसंत नामदेवरायांच्या हरिपाठात भगवंतांची संध्येतील चोवीस नामे आहेत. चोवीस नावांसह नाममाहात्म्य वर्णन केले आहे. नामदेवराय स्वतः नामस्वरूपी एकरूप झाले होते. नाम होणे म्हणजेच देव होणे. नाम घ्यावयाचे नसते किंवा द्यावयाचे नसते, तर नाम व्हावयाचे असते. स्वतः भक्ताने, नामस्मरण, जप करणाऱयाने नामरूप होणे ही नामयोगाची सफलता होय. नामस्मरण म्हणजे महाचैतन्याची अखंड स्फुरणधारा होय. संतांच्या हरिपाठात आध्यात्मिक मार्गदर्शन, तत्त्वज्ञान व आत्मज्ञान सांगितले आहे.