
बारावीच्या परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो, तो तुम्ही यशस्वीपणे पार पाडला यासाठी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन! एकदा तुम्ही ठरवले की तुम्ही साध्य करू शकत नाही असे काहीही नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बारावीच्या परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
ज्या विद्यार्थ्यांच्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागला नाही, त्यांनी खचून जायची गरज नाही. आयुष्यातील सर्वच टप्प्यांवर आपण यशस्वी होतो असे नाही आणि एक परीक्षा आपले भविष्य ठरवत नाही. तुम्ही सर्व समृध्द महाराष्ट्राचा कणा आहात, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी या विद्यार्थ्यांना खचून न जाण्याचा सल्ला दिला.






























































