बहिणीला वाचवण्यासाठी कुत्र्यासोबत केली लढाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चार वर्षांच्या बहिणीचे प्राण वाचवण्यासाठी पिसाळलेल्या कुत्र्यासोबत तुंबळ लढाई करणाऱ्या सहा वर्षांच्या चिमुरड्याचे आज जगभर कौतुक होत आहे. या शूर मूलाचं नाव आहे ब्रिजर वॉकर. अमेरिकेच्या व्योमिंग शहरात राहणारा ब्रिजर कुत्र्यासोबतच्या लढाईत जबर जखमी झालाय. त्याला 90 टाके पडले आहेत. त्याची मोठी बहिण निक्की वॉकर हिने ब्रिजरच्या धाडसाची कथा इन्स्टाग्रामवरून सांगितली होती. तिने जखमी ब्रिजरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. त्यानंतर ब्रिजरच्या धाडसाची दखल माव्र्हल युनिव्र्हसने घेतली. ‘अॅव्हेंजर्स’ सिनेमातील कलाकारांनीही घरी जाऊन त्याचे कौतुक केले. त्याला ‘अॅव्हेंजर’ मधील कॅप्टन अमेरिकाची शिल्ड बक्षिस दिली. ही शिल्ड ‘अॅव्हेंजर’च्या पहिल्या सिनेमात अभिनेता ख्रिस इव्हानने वापरली होती. हॉलीवूडनंतर बॉलींवूड अभिनेता फरहान अख्तर याने ‘याला म्हणतात खरा हीरो’ असं ट्विट करत ब्रिजरवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

‘वल्र्ड बॉक्सिंग काऊंन्सिल’ने दिला किताब

बहादूर भावाची दखल आता वल्र्ड बॉक्सिंग काऊन्सिलने घेतली आहे. या मुलाला आता मानद वल्र्ड चॅम्पियन हा किताब देऊन काऊन्सिलने त्याच्या शौर्याला अनोखा सलाम केला.