
फेसबुक पेजवरील कॅमेरा खरेदी करायला गेलेल्या गुहागर तालुक्यातील एका तरूणाची 38 हजार 728 रूपयांची फसवणूक झाली आहे. गुहागर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुहागर तालुक्यातील पवार साखरी येथील सिध्देश कोळंबेकर यांने फेसबुकवरील कृष्णा कुमार या पेजवर एक विक्रीसाठी असलेल्या कॅमेऱ्याची जाहिरात पाहिली. त्या जाहिरातीवरील मोबाईलवर सिध्देश कोळंबेकर याने संपर्क साधला असता समोरील व्यक्तीने महेंद्र मालविया अशी ओळख सांगून कॅमेरा खरेदीसाठी सिध्देशला गुगल पे वरून पैसे पाठवण्यास सांगितले. सिध्देश कोळंबेकर याने 38 हजार 728 रूपये पाठवूनही त्याला कॅमेरा मिळाला नाही.आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्याने पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली.
























































