
बजाज फायनान्सचे अध्यक्ष राहुल बजाज लवकरच आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे कळते. कंपनीने आज जाहीर केलेल्या रेग्युलेटरी फायलिंगच्या माध्यमातून ही बाब समोर आली आहे. या वृत्तानंतर कंपनीच्या शेअरमध्ये आज घसरण झाल्याचे दिसून आले असून कंपनीचे शेअर आज 6.43 टक्क्यांनी घसरुन 3220 वर बंद झाले आहे. बजाज यांच्या जागी त्यांचे पुत्र संजीव बजाज हे कार्यभार स्वीकारणार आहेत.
फायनान्स क्षेत्रात केगळा असा ठसा उमटविणाऱया बजाज फायनान्स गेल्या काही वर्षांत उत्तम कामगिरी केली आहे. कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज 31 जुलै रोजी पर्यंत आपल्या पदाचा राजीनामा देणार आहे. अध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असले तरी कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून काम बघणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 1 ऑगस्टपासून त्यांचे पुत्र संजीव बजाज हे अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. सध्या ते कंपनीच्या उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.




























































