
संगमेश्वर तालुक्यातील तुरळ तेलीवाडी येथील एका 24 वर्षीय तरुणाने नॉयलॉनच्या दोरीने गोठ्यात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सकाळी उघडकीस आली . नितीन राजेंद्र चव्हाण असे या तरुणाचे नांव आहे .
संगमेश्वर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार चव्हाण यांची पाळीव जनावरे असून नितीन हा गोठ्यात दररोज गुरांना चारा घालण्यासाठी जात असे. घरातील माणसे झोपल्यानंतर रात्री १० : ३० च्या नंतर तो गोठ्यामध्ये गेला. सकाळी नितीनचे वडिल गोठ्यामध्ये गेले असता. नितीन याने नॉयलॉन दोरीने गळफास लावून घेतल्याचे त्यांना दिसून आले. याचा धसका घेऊन वडिलांनी गोठ्यातच हंबरडा फोडला . हा आवाज ऐकून घरातील मंडळींसह शेजाऱ्यांनी गोठ्याकडे धाव घेतली . याबाबतची खबर राजेंद्र चव्हाण यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिली. आर्थिक परिस्थिती आणि कौटुंबिक नैराश्यातून नितीन याने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.




























































