शेवट चांगला व्हायला हवा होता!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचे माजी महान फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे यांनी ऑनलाऊन सेशमध्ये पॉमी म्बांगवा याच्याशी संवाद साधताना म्हटले की, मी हिंदुस्थानी संघाचा प्रशिक्षक असताना टीम इंडियाने चांगली कामगिरी केली. संघाच्या यशात माझाही सहभाग होता. याचा आनंद आहे. कोणताही पश्चात्ताप नाही. फक्त शेवट आणखी गोड व्हायला हवा होता, अशी खंतही पुढे अनिल कुंबळे यांनी बोलून दाखवली. अनिल कुंबळे व विराट कोहली यांच्यामध्ये मतभेद असल्यामुळे अनिल कुंबळे यांना प्रशिक्षकपदावरून माघार घ्यावी लागली होती. सध्या आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचे मुख्य प्रशिक्षक म्हणून अनिल कुंबळे कार्यरत आहेत.