अदानी जादा बिलाची रक्कम व्यजासह परत करणार, शिवसेनेचा दणका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जादा वीज बिलामुळे त्रस्त झालेल्या वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. वास्तविक रिडींग बिलांची रक्कम पाठविलेल्या अंदाजपत्रक रकमेपेक्षा कमी असेल तर, पुढील बिलात व्याजासह आकारण्यात आलेली ही जास्तीची रक्कम परत करण्यात येईल, असे आश्वासन अदानी व्यवस्थापनाने आज दिले आहेत.

शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती, माजी आमदार विनोद घोसाळकर यांनी आज अदानी विद्युत विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक कपिल शर्मा, विजय डिसुझा, सजीवन नानू यांनी भेट घेऊन जादा वीज बिलाबाबत जाब विचाराला. त्यावेळी कंपनीकडून वरील आश्वासन देण्यात आले आहे. यावेळी कंपनीचे व्यवस्थापक संजय पाटील, मुंबै बँक संचालक माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर तसेच नागरिक उपस्थित होते. लॉकडाऊन कालावधीत अदानी कंपनीकडून आलेल्या जादा बिलसंदर्भातील लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती.

यावेळी घोसाळकर यांनी ग्राहकांना आलेल्या सुमारे 100 अधिक बिलांचे पुरावे सादर केले. प्रत्यक्ष रिडींग न करता ग्राहकांना सरासरी बिले पाठविली जातात यामागील तर्कशास्त्रावरही त्यांनी यावेळी प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी कंपनीने वरील आश्वासन दिल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, ग्राहकांना ऑक्टोबर 2020 पर्यंत एप्रिल, मे, जूनमधील तीन महिन्यांचे बिल व्याजमुक्त ईएमआयमध्ये भरण्यास मान्यता देण्यात आली. वीज बिले न भरल्यामुळे ग्राहकांचावीजपुरवठा खंडित करणार नाही, असे आश्वासन देखील यावेळी देण्यात आले आहे.