उद्धवजी लॉकडाऊन उठवा! प्रकाश आंबेडकर यांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
prakash-ambedkar

देशाची अर्थव्यवस्था सुधारण्याच्या कामाला लागलो तरच माणसं जगतील, नाहीतर उपासमारीने मरतील, अशी चिंता व्यक्त करतानाच वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘उद्धव ठाकरे तुम्ही खुदा बनू नका, लॉकडाऊन वाढवू नका’ असे रविवारी म्हटले.

कोरोनामुळे होणारा मृत्यूदर आटोक्यात आणणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावर बोलताना आंबेडकर यांनी, ‘हिंदुस्थानी लोकांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे असे ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. हिंदुस्थानात कोरोना फैलावणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे. पण लॉकडाऊन वाढवला तर माणसे कोरोनाने नाहीत पण रोजगार बुडाल्याने मरतील. त्यामुळे लॉकडाऊन वाढवू नका’ अशी विनंती केली आहे.

माणूस जन्माला आला तर त्याला मृत्यू हा निश्चित आहे असे सत्यवचन बुद्धाने सांगितले आहे. त्यामुळे लॉकडाऊन उठवून अर्थव्यवस्था सुधारण्यावर भर द्या असे ऍड. आंबेडकर यांनी म्हटले आहे.