पर्यावरण रक्षणाचं महत्त्व असलेले मुख्यमंत्री सरकारचं नेतृत्व करताहेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
aaditya-thackeray-press-meet

व्याघ्र संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचं महत्त्व असलेले मुख्यमंत्री ज्या सरकारचं नेतृत्व करताहेत, त्या सरकारसोबत काम करत असल्याचा मला अभिमान आहे, अशी भावना पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त व्यक्त केली आहे.

व्याघ्र दिनानिमित्ताने पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण रक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ट्विटरद्वारे आभार मानले. आदित्य ठाकरे म्हणतात, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात सुरू असलेल्या मानवी हस्तक्षेपाची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली. देशभरातील पर्यावरणवादी कार्यकत्र्यांसोबत मुख्यमंत्री ठामपणे उभे राहिले. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी मागच्या महिन्यात केंद्र सरकारला पत्र लिहिले. हाडाचे छायाचित्रकार असलेल्या उद्धव ठाकरे यांनी वनसंवर्धनासाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत.

वनसंपत्ती वाचवू शकलो तर आयुष्य समृद्ध होईल

व्याघ्रदिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. मुख्यमंत्री म्हणाले, ‘वाघ ही वनसंपत्ती आहे. ज्या जंगलात वाघ असतो, त्या जंगलातील निसर्गचक्र हे पूर्ण मानलं जातं. त्यामुळं व्याघ्रदिन हा एका दिवसापुरती मर्यादित न राहता वाघाचं महत्त्व आपण समजून घेतलं पाहिजे़ महाराष्ट्रात बरीच वनसंपत्ती अस्तित्वात आहे ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ही संपत्ती आपण सगळे मिळून वाचवू शकलो तर ती अधिक समृद्ध होईल. त्यातून आपलं आयुष्य देखील समृद्ध होईल,’ असे सांगून मुख्यमंत्र्यांनी व्याघ्रदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
वन्यजीव संवर्धनाला प्रोत्साहन देणारी धोरणे

90 आणि 2000 च्या दशकात वनसंरक्षकांसाठी वैद्यकीय शिबिरं घेणाNयांना आवश्यक ती साधनं पुरवली आहेत. आताही ते व्याघ्र संवर्धन, वन्यजीव संवर्धन व इको टुरिझमला प्रोत्साहन देणारी धोरणं राबवत आहेत. महाविकास आघाडी सरकारनं तिलारीच्या वनातील 30 चौरस मीटर परिसर संवर्धित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. शाश्वत विकासावर महाविकास आघाडीच्या सरकारचा भर आहे. पर्यावरणाचे महत्त्व माहीत असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील सरकारसोबत काम करत असल्याचा मला अभिमान वाटतो, असेही आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.