रे रोडच्या ब्रिटिशकालीन रेल्वेपुलाच्या जागी नवा केबल ब्रिज, एमआरआयडीसीची नव्या उड्डाणपुलाची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकीकडे भायखळा येथील रेल्वे रुळांवरून जाणाऱ्या उड्डाणपुलाला न पाडताच त्याच्यावर केबल आधारित नवा पूल बांधण्याची घोषणा विरते न विरते तोच रे रोडच्या पुलाच्या जागीही केबल स्टेएड ब्रिज उभारण्याची घोषणा महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (एमआरआयडीसी) केली आहे. हा नवा अत्याधुनिक रे रोड केबल ब्रिज 143 कोटी रुपयांमधून उभारण्यात येणार आहे. शहरातील हे एक आकर्षणाचे केंद्र ठरणार असून येथे सेल्फी पॉइंटही उभारण्याची योजना आहे.

हार्बर मार्गावरील रे रोड स्थानकावरील ब्रिटिशकालीन उड्डाण पुलाच्या जागी दोन्ही बाजूला प्रत्येकी तीन लेन असलेला सहा पदरी केबल स्टेएड ब्रिज बांधण्याची योजना असल्याचे एमआरआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जायसवाल यांनी म्हटले आहे. प्रस्तावित केबल ब्रिजची लांबी (280 मीटर) जास्त असल्याने पिलरखांबांची संख्या कमी होणार आहे. सध्या असलेल्या प्रत्येकी दीड लेनच्या ऐवजी पुलाच्या जागीच केबलचा आधार असलेला नवा पूल उभारला जाणार असून दोन्ही बाजूंना प्रत्येकी तीन अशा एवूâण सहा नवीन लेन बांधण्यात येणार असल्याचे राजेश कुमार जायसवाल यांनी स्पष्ट केले.

नव्या उड्डाण पुलाची वैशिष्ट्ये
कोणत्याही अतिरिक्त जागेची गरज नाहीर्
नवा उड्डाणपूल जुन्या पुलाच्या जागीच उभारणार
माहुल रोड व बॅरिस्टर नाथ पै मार्गाशी जोडणी कायम