
परदेशातून येणार्या लोकांना रोखण्याची गरज होती तेव्हा मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हिंदुस्थानात घेऊन आले. त्यामुळे मोदींनीच हिंदुस्थानात कोरोना आणला म्हटलं तर चुकलं कुठे? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
परदेशातून येणार्यांना लोकांना रोखण्याची,त्यांची कोरोना टेस्टिंग करण्याची गरज होती.त्यावेळी नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या लवाजम्याला बोलावून स्वतःचा राजकीय हेतू साध्य करण्याचा प्रयत्न केला.असे असताना मोदींनीच भारतात कोरोना आणला म्हटलं तर चुकलं कुठे?#coronavirus
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) August 1, 2020
जगभरात थैमान घालणार्या कोरोनाचा प्रादुर्भाव हिंदुस्थानात दिवसेंदिवस वाढत चालला आहे. याबाबत एक ट्विट करत प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. परदेशातून येणार्या लोकांना रोखण्याची, त्यांची कोरोना टेस्टिंग करण्याची गरज होती त्यावेळी नरेंद्र मोदींनी डोनाल्ड आणि त्यांच्या लवाजम्याला बोलावून स्वत:चा राजकीय हेतू साध्य करण्याचा प्रयत्न केला. असे असताना मोदींनीच हिंदुस्थानात कोरोना आणला म्हटलं तर चुकलं कुठे? असा थेट सवाल आंबेडकर यांनी केला आहे.
मोदी हे धार्मिक गटाचे नेते असून त्यांच्यात राजकीय नेतृत्वाची धमक नाही. त्यामुळेच त्यांच्याकडे कोरोनाच्या संकटातून बाहेर येण्याच्या दूरदृष्टीचा अभाव असल्याची टीका आंबेडकर यांनी दोन दिवसांपूर्वीच केली होती.
























































