
देशभरातील विद्यार्थ्यांच्या मानसिक तसंच शारीरिक विकासाला महत्त्व देत यापुढे मिड डे मील योजनेसह विद्यार्थ्यांना ब्रेकफास्ट देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नव्या शैक्षणिक धोरणाअंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेनुसार विद्यार्थ्यांना पोषक ब्रेकफास्ट दिला जाणार असून त्यात न्यूट्रीशनची काळजी घेतली जाणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीचे नव्या शिक्षण धोरणाला मंजुरी दिली आहे. या योजनेअतंर्गत वरील निर्णय घेण्यात आल्याचे कळते. सध्या देशभरातील सरकारी शाळांमध्ये मिड डे मील योजना सुरु आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 नुसार देशभरातील सरकारी शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत मिड डे मील पुरविण्यात येते. या योजनेअंतर्गत 11.59 कोटी विद्यार्थी या योजनेचा लाभ उचलतात. तर नव्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना योग्य आणि पोषक आहार न मिळाल्यास ते आजारी पडतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि न्यूट्रीशनचे महत्त्व लक्षात घेता यापुढे त्यांना मिड डे मीलसह पोषक ब्रेकफास्ट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय शाळांना सामाजिक कार्यकर्ते, समुपदेशक आणि कम्युनिटीला जोडण्याचे प्रयत्न देखील करण्यात येणार आहे.
























































