
>> दिग्पाल लांजेकर, लेखक-दिग्दर्शक
लॉकडाऊन दरम्यान मी दोन मराठी, एका हिंदी चित्रपटाचे आणि एका वेबसिरीजचे लिखाण पूर्ण केले. शिवाजी महाराजांवरचे आठ चित्रपट म्हणजेच शिवराज अष्टक पूर्ण करण्याचे माझे ध्येय आहे. त्यातील ’फर्जंद’, ’फत्तेशिकस्त’ हे दोन चित्रपट रिलीज झालेत. ’जंगजौहर’ जूनमध्ये रिलीज होणार होता पण लॉकडाऊनमुळे रखडला आहे. सगळंच आपल्या प्लॅनिंगनुसार होत नसते त्यामुळे मी काही हातपाय गाळून बसलो नाही. माझे ध्येय पक्के आहे. पुढच्या वर्षी कोरोना असो किंवा नसो मी सगळ्या नियमावली पाळून कामाला सुरुवात करणार आहे. कोणत्याही परिस्थितीत शिवराज अष्टक हे माझे स्वप्न पूर्ण करणारच!
लॉकडाऊनच्या सुरुवातीला कसलाच अंदाज येत नव्हता. काय होतंय कळत नव्हतं. 7 दिवस, 21 दिवस असं करता करता लॉकडाऊन तीन महिन्यांपर्यंत पोहोचले. ज्या केळी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर झाला त्या केळी मी चिन्मय मांडलेकर आणि अजय पूरकर यांच्यासोबत ‘5चा चहा’ हा ऑनलाईन अभिकाचनाचा कार्यक्रम केला. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून दिवसाआड होणाऱया या कार्यक्रमातून मराठी आणि हिंदीतल्या दर्जेदार साहित्यकृतींचे अभिवाचन केले. लोकांचाही याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या माध्यमातून लोकांना पॉझिटिव्प ठेवण्याचा छोटासा प्रयत्न आम्ही केला.
सुरुवातीला सगळ्यांप्रमाणे मलाही कोरोनाची भीती वाटत होती. पुण्यात महापालिका आणि आरएसएसच्या संयुक्त विद्यमाने कंटेनमेंट झोनमध्ये मास्क स्क्रिनिंगचा उपक्रम राबवला होता. त्यात कोविड योद्धा म्हणून सहभागी झाल्यावर माझ्यातली कोरोनाविषयीची भीती गायब झाली. आठ दिवसांत आम्ही जवळपास लाखभर लोकांच्या तपासण्या केल्या. त्यातले केवळ एक हजार संशयित आम्हाला मिळाले. कारंवार हात धुणे, आजूबाजूला स्कच्छता राखणे अशा काही शिस्तींचे पालन केले तर कोरोना तुमच्या आसपासही फिरकणार नाही हे जाणकले. निसर्गाचा आदर करायला पाहिजे हा धडा या दरम्यान सगळ्यांनाच मिळाला. प्रदूषित झालेल्या नद्या किंवा हवा कधीच स्कच्छ होणार नाही असे आपल्याला वाटत होते. परंतु लॉकडाऊन दरम्यान हवेचे प्रदूषण घटले, नद्या स्वच्छ झाल्या. निसर्गाने या काळात स्कतःला ‘हिल’ केले. तुम्ही मला सांभाळले तरच मी तुम्हाला सांभाळेल हा धडाच जणू निसर्गाने दिला.
या संकटात मला शिवचरित्राने खऱया अर्थाने प्रेरणा दिली. आपल्या सगळ्यांच्या जगण्याला शिवाजी महाराजांचा खूप मोठा आधार आहे. महाराजांच्या चरित्रातली तत्त्क अंगीकारली तर आजच्या घडीलाही ती आपल्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतील. लॉकडाऊनच्या काळात सगळ्यात महत्त्काचे होते ते पेशन्स ठेवणे. पेशन्स न ठेकल्याने काहींना नैराश्य आले आणि त्यांनी चुकीचे मार्ग पत्करले. महाराजांच्या आयुष्यात त्या वेळी असे नैराश्याचे प्रसंग आले नसतील का? अफझल खानासारखी एवढी मोठी कावटळ महाराष्ट्रावर मोठय़ा शत्रू सैन्यानिशी चालून आली. त्या वेळी महाराजांनी खचून न जाता त्यातून मार्ग काढलाच ना… महाराज पन्हाळगडावर असताना सिद्धी जौहरने पन्हाळगडाला वेढा दिला होता. लॉकडाऊन तोडून आपण बाहेर पडलो तर आपल्याला ‘कदाचित’ जिवाचा धोका आहे. पण त्या वेळी महाराजांना जिवाचा धोका शंभर टक्के होता. तरीही महाराजांनी पेशन्स ठेऊन काम केले. महाराज तर सर्कात मोठे ‘मॅनेजमेंट गुरू’ म्हणून ओळखले जातात. या काळात ते नक्कीच गप्प बसून राहिले नसतील. स्कराज्याच्या दृष्टीने त्यांनी विचार केला असेलच ना? संकटे कितीही आली तरी आपले ध्येय डोळ्यासमोरून हलू न देता त्यातून मार्ग कसा काढायचा हे मी यातून शिकलो. आजच्या तरुणाईला शिवचरित्र कळले तर त्यांना कधीच तणाव येणार नाही. त्यांना प्रेरणा मिळत राहील आणि आपला समाज कुठेतरी चांगल्या दिशेने वाटचाल करत राहील असे मला वाटते.



























































