
विजयदुर्ग किल्ल्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्व ते प्रयत्न करू, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी कले. पालकमंत्री उदय सामंत यांनी आज विजयदुर्ग किल्ल्याची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.
या वेळी खासदार विनायक राऊत, राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर, सतीश सावंत, अतुल रावराणे, संदेश पारकर, संजय पडते, नागेंद्र परब, विकास पुडाळकर, सचिन खडपे, सुनील खडपे, वर्षा पवार, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार मारुती कांबळे, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, सहा.गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सरपंच प्रसाद देवधर, उपसरपंच महेश बिडये तालुका प्रमुख विलास साळसकर, मिलिंद साटम, प्रसाद करंदीकर, संतोष साटम, विभाग प्रमुख संदीप डोळकर, रमाकांत राणे मुनाफ ठापूर, सरजू घाटये राजू परुळेकर आदी उपस्थित होते.
विजयदुर्ग किल्ल्याचे संपूर्ण बजेट तयार करणार असल्याचे सांगून पालकमंत्री सामंत पुढे म्हणले की, किल्ल्याला जास्तीत जास्त निधी देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी पुरतत्व विभगाशीही चर्चा करण्यात येईल. गरज भासल्यास किल्ल्यासाठी जिल्हा नियोजनमधून निधी देऊ. येत्या वर्षभरात किल्ल्याचे काम सुरू होईल. विजयदुर्ग ग्रामपंचायतीची नवीन इमारत उभारण्यासाठी हा निधी देण्यात येईल. त्यासाठी ग्रामपंचायतने जागेचा प्रश्न मार्गी लावावा. विजयदुर्ग विकासासाठी आराखडा तयार करणार आसल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
सुरुवातीस मराठय़ांचे आरमार प्रमुख आनंदराव धुळप यांच्या वंशजांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. विजयदुर्ग किल्ल्यावरील चिलखती तटबंदीच्या कोसळलेल्या संरक्षक भिंतची, तसेच सदर कान्होबा मंदिर व अन्य भागाची पाहणी केली.या दौऱयात गिर्ये गावचे उपसरपंच जहीर ठापूर यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. तसेच आंबा बागायतदार सुधीर जोशी यांनी पालकमंत्री व खासदार यांची भेट घेऊन आंबा पॅनिंगला हमी भाव मिळावा या विषयांबरोबर अन्य विषयावर चर्चा केली.


























































