पश्चिम बंगालमध्ये तृतीयपंथीयांना दोन सीट राखीव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालमधील खासगी बसमध्ये यापुढे तृतीयपंथीयांना दोन सीट राखीव असणार आहेत. समाजात तृतीयपंथीयांना समान वागणूक, समान हक्क मिळावा, या जनजागृतीसाठी खासगी बसचालकांच्या असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे. असोसिएशनचे महासचिक तपन बॅनर्जी यांनी सोमवारी ही माहिती दिली. राखीव सीटवर ’त्रिधारा’ असे लिहिले जाणार आहे. राज्यातील 35 ते 40 हजार बसेसमध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. तसेच राज्य परिवहन तसेच इतर बसमध्ये तृतीयपंथीयांना राखीव सीट ठेवण्याची मागणी केली जाणार असल्याचे बॅनर्जी यांनी स्पष्ट केले.