गणपती बाप्पा मोरया; गणेश चतुर्थीच्या निमित्ताने बॉबल एआयने केली मराठी कीबोर्डची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठी ही हिंदुस्थानातील, प्रामुख्याने महाराष्ट्रातील 72 दशलक्ष लोकांसाठी, बोलण्याची प्रथम भाषा आहे आणि 3 दशलक्ष लोकांसाठी द्वितीय भाषा आहे. ही देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वाधिक लोकांकडून वापरली जाणारी भाषा आहे. भाषेला पूर्णपणे समर्पित (डेडिकेटेड) असा कॉन्व्हर्सेशन मीडिया प्लॅटफॉर्म पुरवणे खूप महत्त्वाचे आहे, कारण, भाषांतरामध्ये संभाषणाचे संपूर्ण सारच हरवून जाते.  स्थानिक संवादातील आव्हाने सर्वप्रथम समजून घेणारा तसेच प्रादेशिक भाषांमध्ये अस्खलित संवादासाठी प्लॅटफॉर्म पुरवण्याचे ध्येय ठेवणारा, जगातील सर्वांत मोठा कॉन्व्हर्सेशन मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून बॉबल एआयने गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मराठी भाषिकांसाठी मराठी कीबोर्ड आणला आहे.

marathi-keyboard

भावना व्यक्त करण्यासाठी इमोजी हा सर्वांत सुलभ मार्ग आहे. अनेकदा तो प्रत्यक्ष संवादाहून सुलभ वाटतो. दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, चेन्नई, कोलकाता आणि हैदराबाद या श्रेणी 1 शहरांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत इमोजीजच्या वापरात 14 टक्के वाढ झाल्याचे बॉबल एआयला आढळले आहे.

बॉबलचा मराठी कीबोर्ड हे मराठीत टेक्स्ट करण्यासाठी अँड्रॉइडवरील सर्वांत वेगवान आणि नवीनतम मराठी इनपुट टूल आहे. यात एकतर मराठी टाइप करून किंवा बॉबलच्या कीबोर्डचा वापर इंग्रजी ते मराठी अनुवादकाच्या स्वरूपात करून वापरकर्ते टेक्स्ट करू शकतात.

बॉबल एआयने व्हॉट्सअॅपवरून अॅनिमिटेड स्टिकर्स पाठवण्यासाठी एक नवीन सुविधा समाविष्ट केली आहे. अॅनिमेटेड बिगमोजी सर्वांसमोर आणणारा बॉबल एआय हा जगातील पहिला प्लॅटफॉर्म आहे. वापरकर्ते केवळ लाँग प्रेस करून इमोजी पॅनलमधील इमोजी भव्य स्वरूपात पाठवू शकतात. कंपनीने बाप्पांच्या स्वागतासाठीही खास इमोजीज आणल्या आहेत.

बॉबल एआयच्या अतिप्रगत मराठी कीबोर्डमध्ये अपवादात्मक दर्जाचा तसेच पर्सनलाइझ्ड ऑटो करेक्ट आहे. हा ऑटो करेक्ट वापरकर्त्याच्या इच्छा प्रत्येक वेळी अचूक ओळखतो. मग वापरकर्त्याने कोणत्याही भाषेची निवड केली तरी फरक पडत नाही. तुमचं स्वागत असो, तू कसा आहेस, सुप्रभात, पुन्हा भेटू, लवकर बरे व्हा!, अभिनंदन यांसारख्या काही स्थानिक वाकप्रचारांतील शब्दांचा स्वयंचलितपणे अंदाज यात बांधला जातो.

या खास कस्टमाइझ केलेल्या कीबोर्डमध्ये अत्यंत स्मूद स्वाइप टायपिंगची सोय आहे, उत्तम भाषा ते मजकूर (स्पीच टू टेक्स्ट) सपोर्ट आहे. वापरकर्त्यांना टाइप करण्याचीही आवश्यकता भासत नाही. हा अत्याधुनिक कीबोर्ड आणि अनन्य व अस्सल मराठी शब्दोच्चार समजून घेतो आणि त्याचे रूपांतर उत्तम टेक्स्ट संदेशात करतो. वापरकर्ते ‘कार्टून हेड’च्या माध्यमातून त्यांचे पर्सनलाइझ्ड कार्टून अवतार तयार करू शकतात आणि केवळ एका सेल्फीद्वारे
1000 हून अधिक स्टिकर्स व जीआयएफ अॅक्सेस करू शकतात.

बॉबल एआयचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित प्रसाद नवीन कीबोर्डची घोषणा करतेवेळी म्हणाले, “आपण वैविध्यपूर्ण आणि आपल्या मातृभाषेतील प्रभावांशी जवळते नाते असलेल्या लोकांच्या देशात राहतो याचा आपल्याला कायम अभिमान वाटतो. प्रत्येक संभाषणात 2 किंवा 3 वाक्यांनंतर इमोजी येते. बॉबल्स एआय लक्षावधी भारतीयांना 100 हून अधिक भाषांमध्ये संवाद साधण्याची व आशय व्यक्त करण्याची शक्ती देत आहे. कंपनी स्थानिक वापरासाठी सक्रियपणे अधिक स्टिकर्स, गिफ्ट् आणि मिम्ज तयार करत आहे. परिणामी प्रत्येक मिलिसेकंदाला प्रादेशिक भाषाचा स्वीकार वाढत आहे. मराठी कीबोर्ड आणण्यात आला, कारण अशा माध्यमाची गरज होती. एक मित्र दुस-याशी बोलतो त्याहून अस्सल आणि आश्वासक काही असूच शकत नाही.”

असा एनेबल कराल Marathi Keyboard:

अॅप्लिकेशन लिंक: https://play.google.com/store/apps/details?id=marathi.keyboard.marathi.stickers.app

बॉबल एआय विषयी

जगातील पहिला कॉन्व्हप्सेशन मीडिया प्लॅटफॉर्म बॉबल एआय दैनंदिन संभाषणे अधिक समृद्ध करत आहे. कारण, एक मित्र दुस-याला जे सांगतो त्याहून अधिक अस्सल व अधिक आश्वासक दुसरे काहीच नसते. स्टिकर्स, जीआयएफ आणि इमोजीजसारख्या व्यक्तीकरणावर आधारित तसेच पर्सनलाइझ्ड कंटेण्टच्या माध्यमातून 100 हून अधिक भाषांमध्ये सखोल स्थानिकीकरण, एआय आधारित ससंदर्भ शिफारशी, स्पीच-टू-टेक्स्ट व आणखी ब-याच सुविधांसह बॉबल एआय 30 दशलक्ष आणि त्याहून अधिक लोकांच्या संभाषणाची पद्धत बदलून टाकत आहे.

बॉबलचे फ्लॅगशिप उत्पादन बॉबल इंडिक कीबोर्ड हे जगातील सर्वाधिक मान्यताप्राप्त, सर्वांत आकर्षक आणि खिळवून ठेवणारे उत्पादन आहे. या उत्पादनाने गुगलच्या जीबोर्ड मायक्रोसॉफ्टच्या स्विफ्टकी या उत्पादनांनाही मागे टाकले आहे. बॉबल एआयने शक्तिशाली मिंट कीबोर्ड तयार केला आहे. हा शिओमी फोन्सचा डिफॉल्ट कीबोर्ड आहे.

वेबसाइट लिंक – www.bobble.ai
कीबोर्ड अॅप – https://Marathikeyboardapp.com/