
कोरोना संकटामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहन कागदपत्रांची वैधता पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. यामुळे ज्यांच्या कागदपत्रांची वैद्यता संपली आहे, अशांना मोठा दिलासा मिळाला आहे. वाहनांशी संबधीत सर्व कागदपत्रांची वैधता 31 डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. ही मुदत 30 मार्च आणि 9 जून दरम्यान तिसऱ्यांदा वाढविण्यात आली आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटार वाहन अधिनियम 1988 आणि केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 अन्वये फिटनेस, परवाने, नोंदणी किंवा इतर कागदपत्रांची वैधता 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच आपल्या कागदपत्रांची वैधता संपली असेल आणि आपण त्याचे नूतनीकरण केले नसेल. तर आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता नाही. कारण आपल्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही. दरम्यान, यात केवळ अशी वाहने समाविष्ट असतील ज्यांची वैधता 1 फेब्रुवारी 2020 ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत कालबाह्य होत आहे.

























































