पुन्हा जोमाने भरारी घेऊ!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अशोक शिंदे, अभिनेते

कोरोना महामारीने आलेल्या संकटाकडे मी खूप पॉझिटिव्हली बघितलं. माझं पहिल्यापासून सगळय़ांना सांगणे आहे की, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं आरोग्य! आमच्या इंडस्ट्रीबद्दल बोलायचं तर ’हेल्थ’ हे पहिले प्रोफेशन आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तब्येतीने फिट राहाल तर उत्तम भूमिका करू शकाल. चांगले रोल मिळतील. तुमची स्कप्नं पूर्ण होतील. काय होतंय की, मध्यवयात आल्यावर अन आरोग्याच्या समस्या उद्भवल्यावर सर्वच धडपड, सारी स्वप्नं अर्धवट राहतात. जे काही कष्ट करून कमवतो ते आजारपणात जातं.

या संकटात निसर्गाने स्वत: ची ताकद दाखवून दिली आहे. नवनवीन शोध लागत राहिले पाहिजे हे सगळं ठिक आहे. पण एका मर्यादेच्या बाहेर जाऊन काही गोष्टी माणसानं केल्या. जंगल नष्ट करून अख्खीच्या अख्खी शहरे कसली. बाहेरच्या लोंढय़ाचा ताण, लोकसंख्येला आळा नाही, प्रदूषण वाढले. या सगळय़ा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जणू पृथ्वीने स्वत:चं शुद्धीकरण स्वत:च केलंय…. पुढच्या अनेक वर्षांसाठी! मला वाटतं, 100 वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्लूच्या केळी पण असंच झालं होतं.

वैयक्तिक पातळीवर सांगायचं तर, मला व्यायामाची आवड आहे. जिम बंद असल्याने मी चालण्यावर भर दिला. घरात वर्कआऊट, योग- प्राणायाम केलं. मी स्वत: क्वारटांईनचे नियम पाळलं. आता काम नाही, रिकामावेळ आहे, तर गाडी घेऊन कोल्हापूरला जाईन; बाहेर फिरेन असं काही केलं नाही. इंडस्ट्रीत सलग 32 वर्षे काम करतोय. त्यामुळे कुटुंबाला कधी पूर्ण वेळ देता आला नाही. आता मात्र क्वालिटी टाइम कुटुंबासोबत घालवत आहे. एवढा मोठा ‘डिझास्टर’ झालाय, अख्खं जग त्याच्यात अडवलंय तर प्रत्येक गोष्टीत ‘डाऊनफॉल’ तर येणारच. त्याचीच सारखी चर्चा करणं…मग त्यातून नैराश्य येणं… हे सर्व टाळायला हवं. कंपन्या बंद झाल्या, अनेकांच्या नोकऱया गेल्या ही वस्तुस्थिती आहेच. पण जगणं सोडू नका. मनानं खचू नका.

एक काळ येतो प्रत्येकाच्या आयुष्यात, कधी करियरमध्ये उतार तर कधी आजारपण- दुखणी…त्यातून जसं आपण बाहेर येतो आणि झेप घेतो, तसंच होणार आहे. कुणाला दोष देऊन उपयोग नाही. ही काळरात्र सुरू आहे. अनेकांची जवळची माणसं दगावलीत. पण लक्षात घ्या, हेही दिवस जातील. पुन्हा आपण दुप्पट जोमाने उभारी मारू.

निर्मात्यांचे बजेट कोलमडले

आमचा 15 ऑगस्टला ’झी’ चा शो सुरू होणार होता. मात्र निर्मात्यांना इतक्या अटी घातल्या आहेत की त्यांचे बजेट चारपट जास्त होतंय. अर्थात सरकारने घातलेल्या अटी योग्यच आहेत. त्यामुळे थोडं आणखी वाट बघून काम सुरू करणेच योग्य. ऑक्टोबरच्या पहिल्या आठकडय़ात परिस्थिती पूर्ववत होईल अशी आशा करूया. लोक काळजी घेत आहेत. मास्क लाकताहेत. आमचेही काही कलाकार मित्र आजारातून बरे झालेत. घरी आलेत.