फोर्टमध्ये इमारतीला आग; एकाची प्रकृती गंभीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फोर्टमधील सौराष्ट्र हॉटेलजवळील बाबुभाई इमारतीला आज रात्री लागलेल्या आगीत एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. फोर्ट येथील सौराष्ट्र हॉटेल, कावसजी पटेल मार्गावरील बाबुभाई या इमारतीला रात्री साडेआठच्या सुमाराला आग लागली. यात दीपक दिलदार (22) हा तरुण 35 टक्के भाजला असून त्याला उपचारासाठी बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अग्निशमन दलाचे बचावकार्य सुरू असून रात्री उशिरा आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याचे अग्निशमन दलातील अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, वरळीत मंगळवारी रात्री अॅनी बेंझट मार्गावरील वरळी येथील स्टिंग सी फेस या 14 मजली इमारतीच्या 8 व्या मजल्यावर आग लागली होती. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले.