
हिंदुस्थान -पाकिस्तान सीमेलगतच्या भागांत गेल्या काही दिवसांपासून विकासकामांना वेग आला आहे. त्याचाच भाग म्हणून स्वातंत्र्यानंतर सुमारे 74 वर्षे अंधारात असलेल्या कुपवाडा भागातील माछील सेक्टरमध्ये वीज पोहोचली आहे. कुपवाडा भागातील केरन सेक्टरमध्ये 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी वीजपुरवठा सुरू करण्यात आला. पुढच्या वर्षी येणाऱया स्वातंत्र्यदिनापर्यंत जम्मू काश्मीरच्या दुर्गम भागात वीज पोहोचवण्याचा उद्देश आहे असे जम्मू काश्मीरच्या वीजपुरवठा विभागाच्या प्रमुखांनी सांगितले आहे. जम्मू-कश्मिरातील 370 कलम हटवल्यानंतर कश्मीर खोऱयात विकासकामांची गंगा वेगाने वाहू लागल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत माछील सेक्टरच्या 20 गावांमध्ये डिझेल जनरेटद्वारे वीजपुरवठा होत होता. मात्र आता पॉवर ग्रीडच्या माध्यमातून वीजपुरवठा केला जात आहे. माछील सेक्टरच्या जवळपास 25,000 लोकांना याचा फायदा होणार आहे.
























































