
कोरोनाच्या नावाखाली असंघटित क्षेत्रावर आक्रमण केले जात आहे. सूक्ष्म आणि मध्यम उद्योग चालवणारे लोक रोज कमवतात आणि खातात. त्यांच्यासाठी तर कोणतीही सूचना न देता करण्यात आलेले लॉकडाऊन हे आक्रमणच होते. कोरोना लॉकडाऊन असंघटित क्षेत्रासाठी मृत्युदंड सिद्ध झालंय अशा शब्दांत कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
अचानक किया गया लॉकडाउन असंगठित वर्ग के लिए मृत्युदंड जैसा साबित हुआ।
वादा था 21 दिन में कोरोना ख़त्म करने का, लेकिन ख़त्म किए करोड़ों रोज़गार और छोटे उद्योग।
मोदी जी का जनविरोधी ‘डिज़ास्टर प्लान’ जानने के लिए ये वीडियो देखें। pic.twitter.com/VWJQ3xAqmG
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 9, 2020
देशाची ढासळती आर्थिक स्थिती आणि बेरोजगारीच्या मुद्दय़ावरून राहुल गांधी मोदी सरकारविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपचा छुपा अजेंडा सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न ते करत आहेत.
लॉकडाऊन कोरोनावर आक्रमण नव्हते. लॉकडाऊन हे हिंदुस्थानातील गरीब, युवकांच्या भविष्याकर आक्रमण होते. लॉकडाऊन मजूर, शेतकरी आणि छोटय़ा व्यापाऱयांवर आक्रमण होते.
वचन कोरोना संपविण्याचे, पण संपवले कोटय़वधी रोजगार
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेतला. पंतप्रधानांनी सांगितले की, 21 दिवसांची लढाई असेल, पण असंघटित क्षेत्राचा मणकाच 21 दिवसांत तुटला. वचन दिले होते 21 दिवसांत कोरोना संपविण्याचे, पण संपवण्यात आले कोटय़वधी रोजगार आणि छोटे उद्योग असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे.
राहुल गांधी म्हणतात…
काँग्रेसने एक नाही, तर अनेक वेळा सांगितले की, गरीबांची मदत
करावीच लागेल. न्याय योजनेसारखी एक योजना लागू करावी लागेल, थेट बँक खात्यात पैसे जमा करावे लागतील. पण नाही केले.
काँग्रेस सांगितले की, सूक्ष्म आणि लघुउद्योगांसाठी पॅकेज तयार करा. त्यांना काचवण्याची गरज आहे. या पैशांशिवाय हे उद्योग नाही जगणार. सरकारने काहीच केले नाही.
उलट सरकारने सर्वात श्रीमंत लोकांचा लाखो करोडो रुपयांचा टॅक्स भरला.
विद्यार्थ्यांना न दिलेल्या सुविधांचे


























































