शेअर बाजार 1,114 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 4 लाख कोटींचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सलग चौथ्या दिवशी मुंबई शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. गुरुवारी सेंसेक्स (Sensex) 1,114 अंकांनी कोसळून 36,553 अंकांवर बंद झाला. तर निफ्टीही (Nifty) 307 अंकांनी घसरला आणि 10,824 अंकांवर बंद झाला. मात्र बाजार एवढा कोसळल्याने गुंतवणूकदारांचे जवळपास 4 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

एसकोर्ट सिक्योरिटीचे रिसर्च हेड आसिफ इकबाल यांनी बाजारात का घसरण पहायला मिळत आहे याचे कारण सांगितले आहे. जागतिक बाजारात निराशेचे वातावरण आहे. ग्लोबल ग्रोथच्या चिंतेने बाजारात नकारात्मक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे घसरण पाहायला मिळत आहे.

बुधवारी अमेरिकी डाओ जोंसमध्ये 1.92 टक्के घसरण पाहायला मिळाली, तर एसएंडपी मफह्ये 2.37 टक्के घसरण झाली. याचेच पडसाद आज हिंदुस्थानी शेअर बाजारात पाहायला मिळाले.