कोरोनामुळे निखळला तारा, अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ. शेखर बसू यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अणु ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष व प्रसिद्ध अणू शास्त्रज्ञ पद्मक्षी डॉ. शेखर बसूयांचं कोरोनामुळे निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोनाचे निदान झाले होते. त्यांच्यावर कोलकातातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

काही दिवसांपूर्वीच डॉ. बसू यांना करोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यानंतर त्यांना कोलकातातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असतानाच गुरुवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सकाळी 4 वाजून 50 मिनिटांनी त्यांचं निधन झालं. डॉ. शेखर बसू यांना कोरोनासोबतच किडनी विकाराचाही त्रास होता.

पाणबुडी अरिहंतसाठी बनवली होती अणुभट्टी
अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष राहिलेल्या डॉ. बसू यांना 2014 मध्ये पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आले होते. डॉ. बसू हे मॅकेनिकल इंजिनिअर होते. देशाच्या अणुऊर्जा क्षेत्रात त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं आहे. खास बाब म्हणजे डॉ. शेखर बसू यांनी अणुऊर्जेवर चालणारी हिंदुस्थानची पहिली पाणबुडी आयएनएस अरिहंतसाठी अत्यंत कठीण असणारी अणुभट्टीदेखील तयार केली होती.