नांदेड – कोरोना बाधितांचा आकडा 15,226 वर, 394 मृत्यूची नोंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना विषाणू संसर्गामुळे आज चार जणांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात आजपर्यंत मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या ३९४ एवढी झाली आहे. आज १५४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले असून, जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या १५२२६ एवढी झाली आहे. आज पौर्णिमानगर नांदेड येथील ५४ वर्षीय महिला, कंधार येथील ९० वर्षीय पुरुष, नांदेड येथील ५५ वर्षीय पुरुष, उमरी येथील ५२ वर्षीय पुरुष अशा चार जणांचा मृत्यू झाला आहे.

आज ६७० रुग्णांच्या स्वॅबचे अहवाल तपासण्यात आले. त्यात ४९४ जणांचे रिपोट निगेटीव्ह आले आहेत तर आज १५४ रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आढळले असून त्यामुळे एवूâण रुग्णसंख्या १५२२६ वर पोहोचली आहे. आज नांदेड महापालिका क्षेत्रात ९७, माहूर २, किनवट १२, कंधार ३, नायगाव ६, हिंगोली ४, नांदेड ग्रामीण १, हदगाव ११, उमरी १, मुखेड ४, परभणी २, अर्धापूर १, धर्माबाद ३, भोकर ३, देगलूर ३, लोहा १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

आज २६३ कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार करुन त्यांना बरे वाटू लागल्याने सुट्टी देण्यात आली. त्यामुळे उपचार घेवून घरी परतलेल्या रुग्णांची संख्या ११४९० एवढी झाली आहे. आता वेगवेगळ्या कोविड केअर सेंटर आणि खासगी रुग्णालयात मिळून ३२७४ रुग्ण उपचार घेत असून, त्यापैकी ५० जणांची प्रकृती गंभीर आहे.