
कोरोनाचा वाढता प्रसार ही अत्यंत गंभीर बाब बनत चालली आहे. अशावेळी लुधियानास्थित सेगुरामॅक्स ग्लोबल या स्टार्ट-अपने ’कीप-यू-सेफ’ या तंत्रज्ञानाची घोषणा केली आहे. जगातील या पहिल्याच तंत्रज्ञानामुळे त्यांच्या उत्पादनांच्या पृष्ठभागावरील विषाणूंची संख्या लक्षणीय प्रमाणात कमी करण्यात यश आले आहे. जगभरात हे तंत्रज्ञान संपूर्ण चित्र पालटवू शकेल, असा विश्वास सेगुरामॅव्सला आहे. कंपनीने बायो ऑरगॅनिक घटकांचा वापर करून कीप यू सेफ उत्पादनांची रेंज आणली आहे. यात सर्व हवामानात वापरता येणारी जॅकेट्स, पीपीई सुट्स, किराणा मालाच्या पिशव्या, चादरी, सीट कव्हर, मास्क आदी उत्पादनांचा समावेश आहे.


























































