अभिनेत्री मिष्टी मुखर्जीचे 27 व्या वर्षी अकाली निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बंगाली आणि बॉलिवूड अभिनेत्री मिष्टी मुखर्जी हिचे निधन झाले आहे. शुक्रवारी रात्री बंगळुरू येथे किडनी फेल झाल्याने तिची प्राणज्योत मालवली. वयाच्या 27 व्या वर्षी तिने सिनेजगतातून एक्झिट घेतल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे.

2012 ला ‘लाईफ की तो लग गई’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र यानंतर तिला मोठे प्रोजेक्ट मिळाले नाही. अभिनयासह तिने काही आयटम नंबर देखील केले आहेत.

वादामुळे चर्चेत
चित्रपटापेक्षा कॉट्रोव्हर्सिमुळे ती जास्त चर्चेत राहिली. 2014 मध्ये तिच्यावर सेक्स रॅकेट चालवल्याचा गंभीर आरोप झाला होता. तिच्या घरी अनेक सीडी देखील सापडल्या होत्या.