
हिंदुस्थानने सोमवारी ‘सुपरसॉनिक मिसाईल असिस्टेड रिलीफ ऑफ टॉरपीडो’ची (SMART) चाचणी (फ्लाईट टेस्ट) यशस्वीरित्या पार पडली. ही चाचणी ओडिशाच्या तटाजवळ ‘व्हीलर आयलॅण्ड’मध्ये पार पडली. चाचणी दरम्यान मिसाईलची रेंज, अल्टिट्य़ुड, नोज कोनची वेगळी होण्याची प्रक्रिया, टॉरपिडो सोडण्याची क्षमता आणि वेलोसिटी रिडक्शन मेपॅनिझम (VRM) वर स्थापिक करण्याच्या प्रक्रियेसहीत सर्व इतर विशेषतांची पडताळणी करण्यात आली.हिंदुस्थानचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’चे (Defence Research and Development Organisation-DRDO) या कामगिरीसाठी अभिनंदन केलंय.

























































