
अयोध्येतील मशिदीसाठी आता अन्य धर्मीयांकडूनही देणग्या यायला सुरुवात झाली आहे. लखनौ विद्यापीठाचे कर्मचारी रोहित श्रीवास्तव यांनी धनीपूर गावात उभारण्यात येणाऱया मशिदीसाठी आणि इस्लामिक कल्चर स्टडीजसाठी 21 हजार रुपयांची देणगी देत शुभारंभ केला आहे.
अयोध्येत मशीद बांधण्यासाठी सुन्नी वक्फ बोर्डाकडून ‘इन्डो इस्लामिक कल्चर’ या ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून मशिदीच्या निर्मितीचा खर्च उभा केला जाणार आहे. शनिवारी रोहित श्रीवास्तव या लखनौ विद्यापीठाच्या कर्मचाऱयाने इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशनला (आयआयसीएफ) 21,000 रुपयांची देणगी दिली. रोहित श्रीवास्तव हे पहिले असे देणगीदार आहेत, जे इंडो इस्लामिक कल्चर ट्रस्टचे सदस्य नाहीत.























































