
आळंदी जनकल्याण फाऊंडेशनच्या वतीने आळंदी निवासी राहुन वारकरी सांप्रदायिक शिक्षण घेत असलेले विद्यार्थी, शिक्षण घेतलेले साधक, वारकरी, भाविक यांच्यासाठी एक वेळच्या दैनंदिन अन्नदान प्रसाद वाटप रोज दुपारी साडे बारा ते दीड या वेळात होणार आहे. या सामाजिक बांधिलकीतून सुरू होत असलेल्या उपक्रमाचा प्रारंभ सोमवारी करण्यात आला.
नाव नोंदणी करून अन्नदान प्रसाद सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष प्रल्हाद भालेकर यांनी केले आहे. यासाठी स्थळ व संपर्क ह.भ.प.श्री गजानन महाराज लाहुडकर श्री मुक्ताई संस्थान वराडकर धर्मशाळा, गोपाळपुर आळंदी येथे साधावा असे आवाहन सचिव अर्जुन मेदनकर यांनी केले आहे. यावेळी ह.भ.प.गजानन महाराज लाहुडकर, नगरसेवक संस्थेचे खजिनदार सागर भोसले यांनी मार्गदर्शन केले.
साधक वारकरी यांनी नावनोंदणीसाठी विश्वस्त व व्यवस्थापक ह.भ.प.गजानन महाराज लाहुडकर- 99213 64236, ह.भ.प. सागर महाराज लाहुडकर पाटील – 84214 61054 यांच्याशी संपर्क साधावा, अशी माहिती सचिव अर्जुन मेदनकर यांनी केलं आहे.




























































