पुण्यात घरफोड्यांचे सत्र सुरुच; वारजेत चार फ्लॅट फोडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरातील विविध भागात घरफोड्याचे सत्र कायम असल्याचे दिसून येत आहे. चोरट्यांनी वारजेतील साई सयाजीनगर सोसायटीतील चार बंद फ्लॅट फोडून चोरीचा प्रयत्न केला आहे. त्याशिवाय चोरट्यांनी सोयायटीच्या आवारातील एका रहिवाशाची दुचाकी चोरुन नेली. याबाबत सचिन शिर्के (वय 25,रा. साई सयाजीनगर, वारजे) यांनी वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

साई सयाजीनगर सोसायटीत चोरट्यांनी बुधवारी रात्री शिर्के यांच्या फ्लॅटचे कुलुप तोडले. त्यांच्या घरातून 30 हजारांचे सोन्याचे दागिने लांबविले. त्याच सोसायटीतील रहिवासी महादेव कदम यांच्या फ्लॅटचे कुलुप तोडून 12 हजारांचा लॅपटॉप चोरून नेला. अनिल कदम यांच्या घरातून टीव्ही चोरुन नेण्यात आला. सोसायटीच्या आवारातील रहिवासी प्रथमेश करंबळे यांच्या घराचे कुलुप तोडून चावी घेत पार्किंगमधील दुचाकी चोरुन नेली. घटनेची माहिती मिळताच वारजे पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण पोलिसांनी ताब्यात घेतले असून उपनिरीक्षक अमोल कदम तपास करत आहेत.