
>> शमिका कुलकर्णी (आहारतज्ञ)
शरीरातील विषद्रव्य बाहेर टाकण्याच्या क्रियेला डिटॉक्सिफिकेशन म्हणतात. शरीरात साठलेले विषद्रव्य आरोग्यासाठी हानीकारक असतात. म्हणूनच वरच्या वर आपल्या शरीरातून हे विषद्रव्य बाहेर टाकणे महत्त्वाचे असते. पण अनेक जण डिटॉक्सच्या नावाखाली विविध प्रकारचे फॅड डाएट्स करून पाहतात. पण यामुळे शरीराला अनेक वेळा फायद्यापेक्षा तोटा होण्याची जास्त शक्यता असते. आपल्या शरीराची स्वतंत्ररीत्या विषद्रव्य बाहेर टाकण्याची क्षमता अफाट असते. आपल्या आहारात आणि जीवनशैलीत काही सोपे बदल करून आपण शरीराला स्वतंत्ररीत्या डिटॉक्स करण्याकडे प्रोत्साहित करू शकतो. यासाठी काही टिप्स.
– पुरेसे पाणी शरीराला पुरवावे. यामुळे शरीरातून विषद्रव्ये काढून टाकण्यास मदत होते.
साखरविरहित पेयही उपयुक्त ठरतात, जसे लिंबूपाणी, ग्रीन टी, हळद घालून कोमट पाणी, जिऱयाचे पाणी, शहाळ्याचे पाणी इ.
– ताज्या भाज्या व फळे यांचा मुबलक समावेश आहारात करावा. डिटॉक्स करताना फळांचे रस पिंवा मिक्सरमधून वाटलेली सूप घेऊ नयेत. तर अख्खी ताजी फळे व सलाड आणि चिरलेल्या भाज्या घालून सूप घ्यावी.
– तेलकट, तुपकट, पिंवा गोड पदार्थ खाऊ नयेत.
– कोणतेही बाहेरचे पिंवा पॅकेज्ड पदार्थांचा समावेश आहारात करू नये.
– स्वयंपाकघरात सहज उपलबध पदार्थ जसे लिंबू, आलं, लसूण, पुदिना, तुळस, लवंग, सब्जा अशा आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करावा.
— चहा किंवा कॉफीचा समावेश करू नये.
– मोबाईल, टीव्ही, कॉम्पुटर, आयपॅडचा वापर कमीत कमी करावा. यामुळे मन शांत राहण्यास मदत होते.
– मानसिक तणाव वाढेल अशा गोष्टी करू नयेत.
– शांत व पुरेशी झोप महत्त्वाची असते. अपुरी झोप झाल्यास शरीरातील आम्ल पित्त वाढते आणि त्रास होतो.
– ताजी मोकळी हवा, श्वसनक्रियेचे व्यायाम, योगा, प्राणायाम हे सर्व प्रकार डिटॉक्स करण्यासाठी उपयुक्त ठरतात.
अशा प्रकारे डिटॉक्स केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. उत्साह वाढतो, पचनक्रिया सुधारण्यास मदत होते, पित्त पिंवा अपचनाचा त्रास कमी होतो, मन शांत राहण्यास मदत होते, मानसिक तणाव कमी करण्यास मदत होते.



























































