नगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 50 हजारांच्या पार, 45 हजारांहून अधिक रुग्ण बरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिल्ह्यात आज रविवारी 376 रूग्णांची नोंद झाली असून कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 50 हजारांच्या पार गेला आहे. मात्र दिलासादायक म्हणजे 45 हजारांहून अधिक रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

जिल्ह्यात आजपर्यंत 50 हकार 599 रुग्ण सापडले असून 45 हजार 797 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या 4 हजार 14 रुग्णांवर उपचार सुरू असून 788 रुग्ण दगावले आहेत. आज 415 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.