
बिहार विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने 30 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा समावेश आहे.
स्टार प्रचारकांच्या यादीत मोदी यांच्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ वगळता भाजपाची राजवट असलेल्या अन्य राज्यांतील एकाही मुख्यमंत्र्याचा या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. भाजपाध्यक्ष नड्डा यांची बिहारमध्ये रविवारी पहिली प्रचारसभा गया येथे झाली. ‘मोदी है तो मुमकीन है, नितीश है तो संभव है’ असा नारा यावेळी नड्डा यांनी दिला.

























































