
नागपूरमध्ये 7 डिसेंबरपासून होणाऱया विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावरही कोरोनाचे सावट आहे. पण कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विधीमंडळात निगेटीव्ह प्रेशरचा वापर करण्यात येणार आहे. हॉस्पिटलमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी निगेटिव्ह प्रेशरचा वापर करण्यात येतो. त्याचधर्तीवर हिवाळी अधिवेशनात या तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. त्यामुळे आमदारांचा कोरोनापासून बचाव होऊ शकतो.
राज्याकर कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे मुंबईत दोनच दिवसांचे पावसाळी अधिवेशन झाले. 7 डिसेंबरपासून नागपूरमध्ये विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन होणार आहे. नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात आमदारांचे कोरोनाच्या संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी विविध उपाय योजण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विधीमंडळात निगेटिव्ह प्रेशर वापरण्यात येणार आहे.
या संदर्भात अधिक माहिती देताना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, एसी यंत्रणेमुळे कोरोनाला धोका असतो. त्यामुळे सभागृहात निगेटिव्ह प्रेशर वापरण्यात येणार आहे. मुंबईत कोविड सेंटरमध्ये हे तंत्रज्ञान वापरले होते. आता नागपूरच्या अधिवेशासाठी सभागृहात याचा प्रयोग केला जाईल. त्याचे टेंडरही निघाले आहे. अधिवेशनाच्या काळात कोणालाही कोरोनाची लागण होऊ नये ही आमची जबाबदारी आहे. अशा तंत्रज्ञानाचा प्रथमच वापर होत आहे. पुढे मुंबईतही विधान भकनात हे तंत्रज्ञान वापरले जाईल.
अधिवेशनाचा कालावधी
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी किती असेल असा प्रश्न विचारला असता अधिवेशन सल्लागार समितीमध्ये त्याचा निर्णय होईल. या बैठकीत कामकाजाचा कालावधी ठरेल. असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले. पाकसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न वगळण्यात आले होते. पण हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न स्कीकारण्यात येणार आहेत.
निगेटिव्ह प्रेशर म्हणजे काय
संसर्गाला रोखण्यासाठी निगेटिव्ह प्रेशरचा वापर हॉस्पिटलमध्ये केला जातो. गोवर, टीबी व आता कोरोनाच्या संसर्गजन्य आजारात रुग्णांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवताना निगेटिव्ह प्रेशरचा वापर होतो. हॉस्पिटलमध्ये या खोलीत हवेचा दाब हा बाहेरील हवेच्या दाबापेक्षा कमी असतो. त्यामुळे खोलीचा दरवाजा उघडल्यावर बाहेरून येणाऱया दूषित हवेसोबत संसर्ग व इतर दूषित कण आत येत नाहीत. त्याऐवजी फिल्टरमधून आलेली हवा रुममध्ये जाते आणि खोलीतून दूषित हवा एक्झॉस्ट सिस्टमच्या माध्यमातून बाहेर सोडली जाते. त्यामुळे खोलीत स्वच्छ हवा असते. हॉस्पिटलमध्ये वापरले जाणारे निगेटिव्ह प्रेशरचे तंत्रज्ञान विधीमंडळाच्या सभागृहात वापरले जाईल..



























































