गणपतीपुळ्यात विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या पिल्लाला जीवदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणपतीपुळे रामरोड येथील एका विहिरीत बिबट्याचे पिल्लू पडले. वनविभाग, पोलीस आणि ग्रामस्थांना बिबट्याच्या पिल्लाला विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले आहे.

दिनेश बापट यांच्या बागेतील विहिरीत बिबट्याचे पिल्लू पडल्याचे निदर्शनास आले. त्या पिल्लाला बाहेर काढण्यासाठी पोलीस आणि वनविभागाला कळविण्यात आले. त्यानंतर विहिरीत प्लास्टिकची टोपली टाकून त्या पिल्लाला विहिरीतून बाहेर काढण्यात आले. हे तीन-चार महिन्याचे पिल्लू असून याच परिसरात बिबट्याची मादी असण्याची भीती व्यक्त होत आहे.