
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आर. डी. त्यागी यांचे आज हिंदुजा रुग्णालयात वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले. त्यागी हे एक धडाडीचे पोलीस आयुक्त म्हणून ओळखले जायचे. मुंबईत गँगवार वाढले असताना या आयपीएस अधिकाऱयाने पोलिसांना ‘बुलेट का जवाब बुलेट’ने द्या, असे आदेश देऊन मुंबईत संघटित गुंड टोळय़ांचे पंबरडे मोडले होते. प्रथमच मुंबई पोलिसांच्या चकमकीत वर्षभरात 1995 साली 56 गुंड ठार झाले होते. चकमकाRचा हा विक्रम होता. आर. डी. त्यागी 1995 ते 1996 यादरम्यान मुंबईचे पोलीस आयुक्त होते.






























































