कॅम्पमध्ये पादचारी महिलेचा मोबाईल हिसकाविला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचारी महिलेच्या हातातील 21 हजारांचा मोबाईल हिसकावून नेला. ही घटना दोन दिवसांपुर्वी रात्री पावणेनउच्या सुमारास कॅम्पमधील जनरल बेउर रस्त्यावर घडली. याप्रकरणी पराग दुवा (वय 47) यांनी लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला पराग गृहिणी असून कॅम्प परिसरात राहायला आहेत. दोन दिवसांपुर्वी रात्री साडेआठच्या सुमारास त्या परिसरात रस्त्याने चालल्या होत्या. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या हातातील 21 हजारांचा मोबाईल हिसकावून नेला.