
सोमवारी दुपारी प्राप्त झालेल्या 588 जणांच्या अहवालापैकी 73 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर 515 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. गेल्या दोन दिवसापासून कोरोनाबाधितांचा आकडा शंभरच्या आत असल्याने बीड जिल्हावासियांना दिलासा मिळाला आहे.
बीड जिल्ह्यातील कोरोनाबाबतचा अहवाल सोमवारी प्राप्त झाला. 588 पैकी 73 जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले तर 515 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. आज अंबाजोगाईत 7, आष्टी 1, बीड 15, धारूर 11, गेवराई 11, केज 3, माजलगाव 5, परळी 2, पाटोदा 3, शिरूर 14, वडवणी 1 असे रूग्ण सापडले आहेत.
आज 111 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. बीड जिल्ह्यात एकुण 12270 कोरोनाबाधितांची संख्या झाली आहे. त्यापैकी 10455 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 1418 जणांवर उपचार सुरू आहेत. बीड जिल्ह्यात आतापर्यंत 397 जणांचा बळी गेला आहे. मृत्युचा दर 3.24 एवढा आहे.




























































