
आपल्या मराठी विज्ञान परिषदेचे विज्ञान परिषदेचे विज्ञान अधिवेशन येत्या 13 ते 17 डिसेंबर या कालावधीत होत आहे. कोरोना काळात अत्यंत दूरगामी दृष्टिकोन ठेवून या अधिवेशनाचे नियोजन करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांसाठी
विद्यार्थ्यांसाठीही सेशन्स असून त्यांच्यासाठी आम्ही वेगवेगळे प्रयोग डिजिटल माध्यमातूनच करायला देणार आहोत. त्यासाठी आधी त्यांनी नोंदणी करून त्यांना विषय देण्यात येईल आणि मग त्यांनी प्रयोग करून आम्हाला दाखवायचे. असा एक विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम आहे.
आभासी सहल
शेवटचा कार्यक्रम आमचा सहलीचा असतो. या वेळेला आम्ही आभासी पद्धतीच्या सहली काढणार आहोत. हे या अधिवेशनाचं वेगळं वैशिष्टय़ असणार आहे. पुण्यात पाबळला विज्ञान आश्रम आहे. शिक्षणाद्वारे जीवनावश्यक कैशल्य विद्यार्थ्यांना देऊन विकास घडवून आणण्याच्या संकल्पनेतून डॉ. श्रीनाथ कलबाग यांनी या संस्थेची निर्मिती केली. शालेय शिक्षणात ज्यांचे लक्ष नाही, पण या कैशल्यातून त्यांचा विकास करत असतात. त्या संस्थेची एक ट्रिप आहे. वरळीचे नेहरू सायन्स सेंटर आहे, ती एक ट्रिप आहे, सिंगापूरचे म्युझियम आहे त्याची आहे, चौथी ट्रिप आम्ही ठरवतोय कदाचित पॅनडाची राजधानी ओटावा आहे. तिथले म्युझियम त्यांना दाखवणार आहोत. एक-एक म्युझिअम वीस ते पंचवीस मिनिटे दाखवण्यात येईल. या संस्थांवरील व्हिडीओज दाखवून घरबसल्या तुम्हाला त्या सहलीला गेल्याचा आनंद देणार आहोत.
मराठी विज्ञान परिषदेचे पंचावन्नावे विज्ञान अधिवेशन 13 ते 17 डिसेंबर यादरम्यान होणार आहे. घरबसल्या या अधिवेशनाचा विज्ञानप्रेमींना लाभ घेता येणार आहे. त्यासाठी घरातून बाहेर पडायची गरज नसून अधिवेशनात डिजिटल माध्यमातून सहभागी होता येणार आहे.
राष्ट्रीय पातळीवर भरणारे हे मराठी विज्ञान अधिवेशन दरवर्षी देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी असते. अधिवेशनासाठी प्रत्यक्ष तिथे चारशे ते पाचशे लोक जमतात. यंदाचे आमचे अधिवेशनाचे पंचावन्नावे वर्ष आहे. त्यामुळे आम्ही ते जळगावला करणार होतो. दरवर्षी एक वर्ष आधीच पुढचे अधिवेशन पुठे होणार त्याची घोषणा करतो, पण आता कोरोनामुळे एकत्र जमणं अवघड असल्याने आम्ही डिजिटल माध्यमातून हे अधिवेशन घेणार आहोत आणि साधारण रोज हे अधिवेशन अडीच तासांचे असणार आहे. पहिला दिवस रविवार आहे. त्यामुळे आम्ही तीन सेशन घेणार आहोत. सोमवारपासून गुरुवारपर्यंत पुढचे चार दिवस संध्याकाळी सहा ते साडेआठ अशी आम्ही आखणी केलेली आहे. अडीच-अडीच तासांची सेशन्स डिजिटल माध्यमातून घेणार आहोत. यंदाच्या अधिवेशनासाठी हिंदुस्थान सरकारचे कैन्सिल ऑफ सायंटिफिक अॅण्ड इंडस्ट्रिअल रिसर्चचे महासंचालक डॉ. शेखर मांडे अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवणार आहेत. हिंदुस्थान सरकारने आवाहन केल्याप्रमाणे त्यांनी कोरोनासंदर्भात लस निर्मितीमध्ये भाग घेतलेला आहे. तोच विषय त्यांना दिलेला आहे. लस निर्मिती ही कशी केली जाते, त्यात काय अडचणी येतात, ती करायला किती वेळ लागतो, त्याच्यावरच्या ट्रायल कशा असतात, त्याची नेमकी प्रोसेस काय यावर ते लोकांशी संवाद साधणार आहेत. अधिवेशनात आपण वेगवेगळ्या विषयांवर परिसंवाद ठेवले आहेत. यामध्ये सध्याच्या काळाला अनुसरून विषय घेतलेले आहेत. यात अध्यक्षीय भाषणात लस निर्मितीवर भाष्य आहे. तसेच आपले सगळे व्यवहार, मीटिंग्स हे सध्या डिजिटल माध्यमातून होतात. ही माध्यमं वापरत असताना लोकांना अडचणी काय येतात, या अडचणी सोडवण्यासाठी काय करता येईल? ही माध्यमं आधीही उपलब्ध होती, लोकही वापरत होते, पण ती सामान्य लोकांमध्ये जास्त वापरली जात नव्हती. आता मात्र त्याचा वापर वाढला आहे. आपलेच नातेवाईक जगभर विखुरलेले आहेत. त्यांची गाठ पडणं फार मुश्कील होते. एखाद्या लग्न समारंभात काहींच्या भेटी होतात.
विज्ञान क्षेत्रातील मान्यवर
यंदा आम्ही मे आणि जून महिन्याच्या प्रत्येक रविवारी दोन तास डिजिटल माध्यमावरून जगभर असलेल्या नातेवाईकांना, सगळ्यांना भेटत होतो आणि ते काय करतात, त्यांचं तिथलं घर कसं आहे आणि आणखी एखादा विषय घेऊन त्यावर बोलत होतो. त्याचा आम्हाला फायदा झाला, पण हे वापरत असताना अडचणी काय आहेत हाही एक विचार आहे आणि त्यासाठी आम्ही एक परिसंवाद ‘या दूरदृश्य माध्यमातील वापरातल्या अडचणी’ असा घेतला आहे आणि त्यामध्ये या क्षेत्रातले पुण्याचे डॉ. भूषण केळकर आहेत. ते झाल्यावर मेघश्री दळवी. या दोघांचेही होकार आले आहेत. नासामध्ये असलेल्या अमिमा पाटील यांच्याशी माझा संपर्प चालू आहे. जे लोक अनेक वर्षे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत, त्यांना आम्ही या अधिवेशनात भाग घेण्यासाठी विनंती केलेली आहे. तसेच एक परिसंवाद आमचा ‘महिला अभियंत्यांचे अनुभव’ या विषयावर आहे. यामध्ये माटुंग्याच्या इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजीच्या जालनातील विभागीय संचालक डॉ. स्मिता लेले आहेत आणि त्या अन्न या विषयातल्या तज्ञ आहेत. तेव्हा त्यांचे शिक्षणातले महिला म्हणून अनुभव काय आहेत? हे झाल्यावर एक ओएनजीसीमध्ये फायर इंजिनीअर असलेल्या हर्षिणी कान्हेकर या संवाद साधणार आहेत. त्यांच्या क्षेत्रातले अनुभव काय आहेत? ते झाल्यावर सुधा मूर्ती जर आम्हाला उपलब्ध झाल्या तर त्यांच्याशी आमचा संपर्प चालू आहे. अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या महिला घेऊन त्यांचे अनुभव काय आहेत, त्यांना त्या क्षेत्रात काय अडचणी आल्या हे आपण जाणणार आहोत.





























































