ऑनलाईन बैठकीदरम्यान पत्रकाराने नको ते केले, निलंबनाची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांना वर्क फ्रॉम होम करावे लागत आहे. या काळात अनेकांना अडचणी येत आहेत. तर काही गमतीशीर, मजेदार किस्सेही घडत आहे. तर कधी कॅमेरा सुरू राहिल्याने आयुष्यातील काही खासगी क्षण सार्वजनिक होत आहेत. याआधीही कॅमेरा सुरू राहिल्याने काही जणांचे अश्लील वर्तन आणि काही आक्षपार्ह दृश्ये सार्वजनिक झाली होती. आता अशीच एक घटना न्यूयॉर्कमधील पत्रकारांसोबत घडली आहे. जेफ्री टुबिन असे त्या पत्रकाराचे नाव असून ते न्यूयॉर्करमध्ये वार्ताहर आहेत.

न्यूयॉर्कमधील पत्रकार जेफ्री टुबिन आपल्या सहकाऱ्यांसोबत झूम कॉलवरील बैठकीत होते. त्यावेळी अचानक जेफ्री यांनी आपले कपडे उतरवण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी हस्तमैथुन केला. त्यामुळे कॉलवर असणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांना धक्का बसला. या घटनेनंतर जेफ्री यांना निलंबित करण्यात आले आहे. आपण कपडे काढत होतो, त्यावेळी कॅमेरा सुरू आहे, हे आपल्याला माहित नसल्याचे टुबिन यांनी स्पष्ट केले आहे.

झूम बैठकीदरम्यान आपला कॅमेरा बंद असल्याचे समजून आपल्या हातून मोठी चूक झाल्याचे टुबिन यांनी म्हटले आहे. या घटनेबाबत आपण आपली पत्नी, कटुंबिय, सहकारी आणि मित्र यांची माफी मागत असल्याचे टुबिन यांनी स्पष्ट केले आहे. आपण व्हिडीओ बंद केला होता. त्यामुळे आपण झूमवर दिसत नसल्याचे आपल्याला वाटले. आपल्याला झूमवर कोणीतरी पाहत आहे, हेच आपल्याला माहित नव्हते, असे ते म्हणाले. अजाणतेपणी आणि काही तांत्रिक चूकीमुळे ही घटना हातून घडल्याचे ते म्हणाले.

आपण जेफ्री टुबिन यांना कपडे उतरवताना पाहिले असून ते आपला प्रायव्हेट पार्ट दाखवत होते, असे कॉलवर असलेल्या दोन जणांनी सांगितले. या घटनेनंतर जेफ्री टुबिन यांना निलंबित करण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे न्यूयॉर्करच्या प्रवक्त्या नताली रॅबे यांनी सांगितले. मात्र, ही चूक अजातेपणी झाल्याचे टुबिन यांनी स्पष्ट केले आहे.