देवेंद्र फडणवीस यांना कोरोना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः टिव्ट करूनच ही माहिती दिली आहे. पुढील उपचारांसाठी ते मुंबईत सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल झाले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात अनेक दौरे केले. त्याचसोबत बिहार विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने त्यांची बिहारचे प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. त्यामुळे त्यांनी बिहारचा दौरा केला होता. नुकताच देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाचाही दौरा केला होता.

दौऱयांच्या काळात लोकांमध्ये मिसळताना त्यांना कोरोनाची लागण होण्याची भीती होती. त्यामुळे मला कोरोनाची लागण झाली तर मला खासगी रुग्णालयात दाखल करू नका. मला उपचारांसाठी सरकारी रुग्णालयात दाखल करा, असे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे मित्र व माजी मंत्री गिरीश महाजन यांना मध्यंतरी सांगितले होते. त्यांच्या चाचणीत कोरोनाचे निदान झाल्यावर पुढील उपचारांसाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल झाले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट

कोरोनाचा लॉकडाऊन सुरू झाल्यापासून प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यातच गेला; पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे अशी परमेश्वराची इच्छा असावी. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेत असल्याचे फडणवीस यांनी टिव्ट केले आहे.

एकनाथ खडसेंच्या शुभेच्छा

देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लवकर बरे व्हा, अशा शुभेच्छा दिल्या. नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत खडसे बोलत होते.