
>> क्षितिज झारापकर (नाटय़कर्मी)
आपले नाटय़कर्मी सध्या काय करत आहेत? नाटकासारख्या मनस्वी कलेला अमूक आणि तमूक… म्हणजे वातानुकुलीत नाटय़गृह.. तथाकथित आरामशीर बैठक व्यवस्था इ.इ.ची खरेच गरज आहे..? एक सच्चा नाटय़प्रेमी रसिक या साऱया गोष्टींना मात देऊन नाटकाचा आस्वाद कुठेही घेतील.
कोरोनानंतरचं जग यावर खूप चर्चा आणि उहापोह झालेले आहेत. एक सत्य समोर आहे की, आयुष्य कोरोना पूर्वकाळाप्रमाणे होणे नाही. निदान नजीकच्या काळात तरी. मग नाटक शक्यच नाही का? तर नाटक नक्कीच शक्य आहे, पण नाटय़कर्मींना नाटक म्हणून कला प्रकाराचा पुनर्विचार करावा लागणार आहे. Back to the basics म्हणतात तसा विचार. हा विचार दिल्लीत NSD या संस्थेने केला आणि तिथे 21 सप्टेंबरपासून नाटक सुरू झालंय. पेंद्र सरकारने 21 सप्टेंबरपासून 100 लोकांच्या समारंभांना आणि ओपन एअर थिएटरला परवानगी दिली आहे.
आता हे नवीन घाटणीचं नाटक कसं असेल? मराठीत द्विपात्री, त्रिपात्री नाटपं काही कमी नाहीत. अगदी सुपरहिट ठरलेली काही नाटपं या यादीत आहेत. असं एखादं नाटक निवडून किंवा नवीन लिहून ते कोविडच्या सगळ्या नियमांचं पालन करून सादर व्हावं. अर्थातच या सादरीकरणाला जुजबी नेपथ्य व तंत्रसामुग्री लागेल. अशा पद्धतीने उभारलेलं का@म्पॅक्ट नाटक हे जिथे व्याख्यानमाला होतं अशा संस्थांच्या पटांगणांवर व्यासपीठ उभारून सहज सादर होऊ शकतं. अशाप्रकारच्या प्रयत्नांना राज्य सरकारही परवानगी देईल. या पटांगणांवर दो गज की दूरी सांभाळून खुर्च्या लावून तिकीट बारीसहित प्रयोग होऊ शकतात. अशा प्रयोगांना प्रेक्षक येतील का? 5 ऑक्टोबरपासून हॉटेलात बसून खाणं सुरू करण्यात आलं. आज 70 टक्के जागा भरलेल्या असतात. म्हणजेच लोपंही घरी पंटाळलेली आहेत. सर्व दक्षता खरोखर पाळून ती बाहेर पडू पाहताहेत.
अशा प्रयोगातून किती अर्थाजन होणार? प्रत्येक प्रॉडक्टचं एक वेगळं आर्थिक गणित असतं. अशा प्रयोगांचा आतला खर्च कमी असणार. स्टार व्हॅल्यू असणारे कसदार कलाकार आणि तितकाच ताकदीचे दिग्दर्शक व तंत्रज्ञ घेऊन असा प्रकल्प शंभर प्रक्षकांच्या मर्यादेत सहज शक्य आहे. कोरोना पूर्वीचे नाटय़ प्रॉडक्टस् तसेच पुन्हा होणे दीडएक वर्ष शक्य दिसत नाही. नाटय़गृह सुरू करणे हे जिकिरीचं काम आहे. त्यात कोविडचे नियम खरोखर पाळणं जवळजवळ अशक्य होईल. Tick in the box compliance करून ते कदाचित शक्य होईल, पण तसं करून शूटिंग सुरू केलं गेलं आणि असंख्य रंगकर्मी कोविड पॉझिटिव्ह झाले. येथे तर किमान 100 प्रेक्षक असतीलच.
तात्पर्य नाटक लगेच सुरू होऊ शकतं. पसाऱयात छोटेखानी, पण अनुभुतीत आट, स्टार व्हॅल्यू आणि अभिनय काwशल्याने ठासून भरलेले नाटय़प्रयोग खुल्या पटांगणांमध्ये मर्यादित प्रेक्षक संख्येत सुरू व्हायला हवेत. मुंबई-पुण्यातील प्रस्थपित रंगकर्मींनी पुढाकार घेऊन हे सुरू केलं तर उर्वरित महाराष्ट्रातील हौशी रंगकर्मी त्यांच्या त्यांच्या प्रदेशात खूषीने, हिरीरीने आणि जोमाने नाटक सुरू करतील यात शंका नाही.



























































